रोजगारनिर्मितीसाठी सर्वतोपरी सहकार्य | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोजगारनिर्मितीसाठी सर्वतोपरी सहकार्य
रोजगारनिर्मितीसाठी सर्वतोपरी सहकार्य

रोजगारनिर्मितीसाठी सर्वतोपरी सहकार्य

sakal_logo
By

swt2816.jpg
L46191
माणगावः सत्कार सोहळ्यात मनीष दळवी यांनी मार्गदर्शन केले. व्यासपीठावर उमेश तोरसकर, प्रकाष मोर्ये, सगुण धुरी, किशोर शिरोडकर.

रोजगारनिर्मितीसाठी सर्वतोपरी सहकार्य
मनीष दळवीः सारंगी ग्रुपतर्फे माणगावात सत्कार
सकाळ वृत्तसेवा
माणगाव, ता. २८ः माणगाव खोऱ्यातील बेरोजगार तरुणांना रोजगार देण्यासाठी सारंगी ग्रुपने प्रयत्न करावेत. त्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बॅंक सर्वतोपरी सहकार्य करील, असे आश्वासन सत्कार प्रसंगी मनीष दळवी यांनी दिले.
सारंगी ग्रुप माणगावच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींचा सत्कार येथील राधाकृष्ण सांस्कृतिक भवन येथे करण्यात आला. त्यामध्ये जिल्हा बँक अध्यक्ष दळवी यांच्यासह सिंधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरसकर, सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक प्रकाश मोर्ये॑, सामाजिक कार्यकर्ते वृक्षप्रेमी संतोष पावसकर, साहित्यिक स्नेहल फणसाळकर, माणगाव शिक्षण प्रसारक मंडळ अध्यक्ष सगुण धुरी, सचिव एकनाथ केसरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी विजय आकेरकर, संचालक चंद्रशेखर जोशी, महेश भिसे, दत्तदिगंबर धुरी, दत्ताराम जोशी, विनायक नानचे, साई नार्वेकर तसेच दुर्ग मावळा प्रतिष्ठान कोकण विभागीय अध्यक्ष गणेश नाईक यांना सन्मानित करण्यात आले.
श्री. दळवी पुढे म्हणाले, "माणगाव खोरे नेहमीच चांगल्या कामांसाठी पुढे असते. त्यामुळे माणगाव खोऱ्याचे नाव नेहमीच चर्चेत असते. सारंगी ग्रुप विविध सांस्कृतिक, शैक्षणिक, सामीजिक कार्यक्रम घेत असतो. यापुढे त्यांनी येथील तरुणांना रोजगार कसा निर्माण होईल, छोटे-मोठे उद्योग कसे उभे राहतील, सध्या असलेल्या उद्योगांमध्ये कशी वाढ होईल, येथील पडीक जमिनीचा वापर कसा करता येईल, शेतीपूरक व्यवसाय कसे निर्माण होतील यासाठी संस्थेने काम करावे. त्यासाठी लागणारे सर्व सहकार्य सिंधुदुर्ग बँक करेल. माझे पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण माणगाव विद्यालयात झाले. या विद्यालयाने दिलेले शिक्षण, लावलेली शिस्त मला कामी आली. या विद्यालयाच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी सहकार्य करेन."
यावेळी सारंगी ग्रुपचे कार्याध्यक्ष अॅड. किशोर शिरोडकर, सदस्य अजित परब, नाना बोगार, विजय पालकर, चंदू शेडगे, प्रमोद धुरी, प्रमोद म्हाडगूत, बच्चू नाईक, विकी केसरकर, बाळा केसरकर, शामा पावसकर आदी उपस्थित होते. प्रास्ताविक एकनाथ केसरकर यांनी केले. आभार कृष्णा सावंत यानी मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91296 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..