रत्नागिरी-दीड लाखाहून अधिक चाकरमानी येणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-दीड लाखाहून अधिक चाकरमानी येणार
रत्नागिरी-दीड लाखाहून अधिक चाकरमानी येणार

रत्नागिरी-दीड लाखाहून अधिक चाकरमानी येणार

sakal_logo
By

- rat२८p२७.jpg
L46203
- रत्नागिरी ः दहिवली येथे आरोग्य विभागाकडून चाकरमान्यांच्या तपासणीसाठी उभारलेला पेंडॉल.
.......
- rat२८p२८.jpg
46204
- रत्नागिरी ः महामार्गावर हातखंबा तिठा येथील आरोग्य विभागाचे कार्यरत कर्मचारी.
----------------------
बाप्पा येणार घरोघरी; भक्तांची कोकणवारी

एसटी, कोकण रेल्वेने दीड लाखांहून अधिक चाकरमानी येणार; आरोग्यची २१ पथके कार्यरत
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २८ ः गणेशोत्सवानिमित्त यंदा कोकणात जाणाऱ्‍यांची संख्या गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत अधिक असून सुमारे दीड लाखांहून अधिक जण कोकणात येणार आहेत. यासाठी एसटी प्रशासनाकडून सुमारे बाराशे तर कोकण रेल्वेकडून सुमारे दोनशेहून अधिक फेऱ्‍यांचे नियोजन केले आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील खड्डे भरले जात असून आरोग्य, पोलिस यंत्रणा कार्यरत झाली आहे.
कोरोनामुळे गणेशोत्सव साजरा करण्यासाठी अनेक चाकरमान्यांना कोकणातील गावाकडे येता आले नव्हते. अनेकांनी गावातील नातेवाईकांच्या मदतीने बंद घरे उघडून तिथे प्रथा सांभाळल्या होत्या. कोरोनावर मात केल्यामुळे यंदा चाकरमान्यांचा उत्साह द्विगुणित झाला आहे. ३१ ला गणेश आगमन होणार असून सोमवारपासून (ता. २९) मुंबईतून अनेक चाकरमानी गावाकडे येण्यास सुरवात होईल. कोंडी टाळण्यासाठी अवजड वाहतूक बंद करण्यात आली आहे. परराज्यातून आलेले अनेक ट्रक महामार्गाच्या बाजूला उभे करुन ठेवण्यात आले आहेत. जयगड-निवळी येथे खासगी कंपन्यांची मालवाहतूक करणारे ट्रक उभे आहेत.
गणेशोत्सवासाठी एसटी महामंडळाने मुंबईसह आजूबाजूच्या डेपोमधून सोडलेल्या गणपती विशेष जादा गाड्यांना चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत सुमारे ३ हजार ४१४ गाड्या हाऊसफुल्ल झाल्या आहेत. त्यापैकी १ हजार ९५१ गाड्यांचे गट आरक्षण झाले आहे. यंदा महामंडळाने गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड तसेच पुणे येथून २,५०० गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला होता. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्‍या गाड्यांना २५ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. २७ ऑगस्टला १७८ गाड्या रवाना झाल्या. तर २८ ऑगस्टला १ हजार २४१ रवाना झाल्या असून २९ ऑगस्टला १ हजार ४४५ एसटी फेऱ्‍यांचे नियोजन केले आहे. कोकण रेल्वेने गणेशोत्सवासाठी २०० फेऱ्‍यांचे नियोजन केले आहे. रविवारपासून नियमित धावणाऱ्‍या गाड्यांनाही जादा डबे जोडले आहेत. गणेश आगमनाच्या आदल्या दिवशी सर्वाधिक फेऱ्‍या सोडण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे.
----------------------
चौकट
रेल्वे, महामार्गावर पथके
राज्यात कोविडचे बाधित सापडत आहेत. हे लक्षात घेऊन जिल्हात येणार्‍या चाकरमान्यांच्या तपासणीसाठी महामार्गावर, प्रमुख रेल्वे स्थानकांवर तपासणी पथके नेमण्यात आली आहेत. २१ ठिकाणी ही पथके ठेवण्यात आली असून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत पेंडॉल उभारले आहेत. तेथे औषध साठा उपलब्ध करून देण्यात आला असून आरोग्य विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी नियुक्त केले आहेत.
..
ग्राफ करता येईल
चौकट
२७ ऑगस्टला गाड्या रवानाः १७८
२८ ऑगस्टला रवाना झाल्याः १ हजार २४१
२९ ऑगस्टला एसटी फेऱ्‍यांचे नियोजनः १ हजार ४४५

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91306 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..