घराडा कंपनीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घराडा कंपनीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप
घराडा कंपनीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

घराडा कंपनीतर्फे विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप

sakal_logo
By

rat२८p३०.jpg-
४६२१९
खे़डः जिल्हा परिषद शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना घरडा कंपनीतर्फे वह्यांचे वाटप करताना कर्मचारी.
------------
घराडा कंपनीतर्फे मोफत वह्या वाटप
खेड, ता. २८ : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीमधील घरडा कंपनी ही सामाजिक बांधिलकी जपणारी कंपनी आहे. याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून कंपनीने नुकतेच सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. तालुक्यातील ६५ शाळांमधील २२७० विद्यार्थ्यांना १४९२० दर्जेदार वह्या कंपनी मार्फत दिल्या आहेत.
घराडा कंपनीच्या वाटचालीत उद्योगातून प्राप्त नफ्याच्या रक्कमेतून कंपनीने अनेक समाजाभिमुख स्तुत्य उपक्रम राबविले आहेत. समाजाची प्रगती करायची असेल तर प्रथम या समाजाचे भविष्य असलेल्या मुलांचा सर्वांगीण विकास होणे महत्वाचे आहे. शिक्षक त्या करिता खूप मेहनत घेतात व समाजाचे भवितव्य घडवतात. त्या शैक्षणिक कार्यात खारीचा वाटा उचलण्याच्या हेतूने दरवर्षी घरडा कंपनी शालेय वर्षाच्या सुरुवातीलाच लोटे औद्योगिक वसाहत व आजूबाजूच्या शाळांतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करते. दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी सुद्धा शाळेतील प्रत्येक वर्गातील मुलांची संख्या लक्षात घेऊन त्यांना वह्या वाटप करण्यात आले. या वह्या कंपनीतर्फे तयार करून घेण्यात येतात. शिक्षण हाच प्रगतीचा खरा मार्ग आहे. म्हणूनच लाडक्या मुलांनो, खूप शिका व जीवन समृद्ध करा, हा वैज्ञानिक पद्मश्री डॉ. के एच. घरडा यांचा संदेश वह्यांवर लिहून त्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शुभेच्छासह देण्यात आल्या. यावर्षी कंपनीच्या सी. एस. आर सदस्यांनी स्वतः जाऊन मुलांशी संवाद साधून वह्यांचे वाटप केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91307 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..