खेड- गणपती विशेष गाड्या कमी असल्याने नाराजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-  गणपती विशेष गाड्या कमी असल्याने नाराजी
खेड- गणपती विशेष गाड्या कमी असल्याने नाराजी

खेड- गणपती विशेष गाड्या कमी असल्याने नाराजी

sakal_logo
By

गणपती विशेष गाड्या कमी असल्याने नाराजी
दिवसाला रेल्वेच्या केवळ ४ गाड्या ; काही गाड्यांचे डबे वाढवा
खेड, ता. २८ : कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर प्रथमच कोकणात निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे गेली दोन वर्ष कोकणात जायला न मिळालेल्या कोकणवासीयांनी यंदा गणेशोत्सवाकरिता गावी जाण्यासाठी जय्यत तयारी केली आहे; मात्र रेल्वे प्रशासनाने यावर्षी खूपच कमी गणपती विशेष गाड्या सोडल्या आहेत. नियमित गाड्या वगळता गणेश चतुर्थीच्या तीन दिवस आधीपासून प्रत्येक दिवसाला साधारणतः ७ ते ८ जादा गाड्या सोडल्या जातात. परंतु यावर्षी अद्यापपर्यंत दिवसाला केवळ ३ ते ४ गाड्या सोडल्या आहेत. त्यामुळे कोकणात येणाऱ्या प्रवाशानी नाराजी व्यक्त केली आहे.
गणेशोत्सवाला दर वर्षी मुंबई आणि उपनगरातील हजारो चाकरमानी कोकणात येतात. महिना-दोन महिने आधीच रेल्वे एसटीचे आरक्षित करून ठेवतात.कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊन नयेत म्हणून दरवर्षी रेल्वेकडून अतिरिक्त गणपती विशेष गाड्या सोडल्या जातात. कोविडच्या संकटानंतर दोन वर्षांनी नागरिक निर्बंधमुक्त प्रवास करणार असताना जास्त गाड्यांची गरज असताना रेल्वेने दर वर्षीपेक्षा कमी गाड्या सोडण्याचा अनाकलनीय निर्णय घेतला आहे. मागील वर्षी निर्बंध असूनसुद्धा यावर्षी पेक्षा जास्त गाड्या गणेशोत्सव काळात सोडल्या गेल्या होत्या हे विशेष. यंदा तर मुंबई ते चिपळूण आणि रत्नागिरीसाठी तर एकही गणपती विशेष गाडी दिलेली नाही. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची गैरसोय लक्षात घेता मध्य, पश्चिम व कोकण रेल्वेने २५ ते ३१ ऑगस्ट, २०२२ पर्यंत मुंबईतून गावी जाण्यासाठी व ५ ते १२ सप्टेंबर, २०२२ पर्यंत परतीच्या प्रवासासाठी आणखी विशेष गाड्यांची सोय करावी अशी मागणी रेल्वे अभ्यासक अक्षय महापदी यांनी केली आहे.

चौकट
या गाड्यांच्या डब्याची संख्या वाढवा
जनशताब्दी एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस, डबल डेकर एक्स्प्रेस, मुंबई मंगळूरू सुपरफास्ट एक्स्प्रेस आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेसला वाढीव डबे लावा. याशिवाय तुतारी, मुंबई मंगळूर आणि मत्स्यगंधा एक्स्प्रेस २४ डब्यांच्या तर जनशताब्दी, तेजस आणि डबलडेकर २२ डब्यांच्या करायला हव्यात, अशी सूचना अक्षय महापदी यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91314 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..