खेड-गणेशोत्सवासाठी एसटीच्या 10 फेऱ्यांची भर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड-गणेशोत्सवासाठी एसटीच्या 10 फेऱ्यांची भर
खेड-गणेशोत्सवासाठी एसटीच्या 10 फेऱ्यांची भर

खेड-गणेशोत्सवासाठी एसटीच्या 10 फेऱ्यांची भर

sakal_logo
By

गणेशोत्सवासाठी एसटीच्या १० फेऱ्यांची भर
खेड आगारात २० नियमित गाड्या, परतीसाठी ९१ चे बुकींग
खेड, ता. २८ : यंदाचा गणेशोत्सव कोरोना निर्बंधमुक्त असल्याने चाकरमानी सर्वाधिक संख्येने गणेशोत्सवासाठी गावी येणार आहेत. त्यांना आणण्यासाठी येथील एसटी आगाराच्या २० नियमित गाड्यांबरोबरच २५ ते ३१ ऑगस्ट याकालावधीत १० जादा गाड्या धावणार
आहेत. गणेशोत्सवानंतर परतीसाठी ४ ते ७ सप्टेंबर या कालावधीत ९१ गाड्या नोंदणी करण्यात आल्या असून त्यातील ७ गाड्यांचे ग्रुप बुकिंग झाले आहे. कोरोनाच्या संकटापासून गेली दोन वर्षे गणेशोत्सवाला निर्बंध लादले होते. मात्र यंदाचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त असल्याने मुंबई, पुणेस्थित चाकरमानी सुखावले आहेत. चाकरमान्यांच्या सुखकर प्रवासाठी येथील एसटी आगाराच्या २० नियमित गाड्यांबरोबरच १० ज्यादा गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.बसस्थानकातून नियमित सुटणाऱ्या बसफेऱ्यांमध्ये सकाळी ६.१५ वाजता खेड- मुंबई, ७.३० वाजता खेड-आंबेजोगाई ८ वाजता खेड-स्वारगेट, ८.१५ वाजता शिवतर- खेड-मुंबई, ८.३० वाजता खेड-बोरिवली, ९ वाजता खेड-मुंबई, ९.३० वाजता खेड- नालासोपारा, १० वाजता खेड-पुणे, १०.१५ खेड- नालासोपारा, खेड-बोरिवली. ११.३० वाजता खेड-बोरिवली, दुपारी १२ वाजता चोरवणे-खेड-पुणे, १ वाजता खेड- मुंबई, २ वाजता खेड-मुंबई, ३.३० वाजता खेड-पुणे, सायंकाळी ४.३० वाजता खेड-बोरिवली, रात्री ९.३० वाजता खेड-पुणे, १० वाजता खेड-बोरिवली यांच्यासह उर्वरित दोन गाड्यांचा समावेश आहे.
२५ ऑगस्टपासून धावणाऱ्या ज्यादा गाड्यांमध्ये दोन शिवशाही बसेसचा समावेश असून उर्वरित गाड्या साध्या आहेत. यामध्ये सकाळी ८.३० वाजता खेड-विरार, ९.१५ वाजता खेड-चिंचवड, ९.३० वाजता खेड-विठ्ठलवाडी, १०.३० वाजता खेड-भांडुप, ११.३० वाजता खेड-बोरिवली (शिवशाही), दुपारी १.३० वाजता खेड-ठाणे, २.३० वाजता खेड-स्वारगेट, सायं. ४.३० वाजता खेड-ठाणे (शिवशाही), ६.१५ वाजता खेड मुंबई, रात्री ९.३० वाजता खेड-बोरिवली बसफेरीचा समावेश आहे. ७ सप्टेंबर याकालावधीत चाकरमान्यांच्या परतीसाठी ९१ गाड्या बुकिंग करण्यात आल्या असून या बुकिंग गाड्यांमध्ये ७ ग्रुप बुकिंग गाड्यांचा समावेश आहे. बोरिवलीसाठी २८ बसेस मुंबईसाठी ९, नालासोपारा - १२, भांडुप- ६, ठाणे- १४, विठ्ठलवाडी- १०, चिंचवड- ५ बसेसचा बुकिंगमध्ये समावेश आहे. तर उर्वरित ७ ग्रुप बुकिंग गाड्यांमध्ये डोंबिवली- ३, भांडुप- २, परेल- १ व नालासोपारा- १ गाडीचा समावेशआहे. या ग्रुप बुकिंग गाड्यांमध्ये आणखी ४ गाड्यांची भर देखील पडणार असल्याचे सांगण्यात आले.
---

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91315 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..