बचतगटांना ऊर्जितावस्थेसाठी प्रयत्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बचतगटांना ऊर्जितावस्थेसाठी प्रयत्न
बचतगटांना ऊर्जितावस्थेसाठी प्रयत्न

बचतगटांना ऊर्जितावस्थेसाठी प्रयत्न

sakal_logo
By

1D72107

बचतगटांना ऊर्जितावस्थेसाठी प्रयत्न

‘उमेद’ अभियान; ४३३ बचतगटांना पावणेबारा कोटीचा कर्जपुरवठा

विनोद दळवी ः सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. २८ ः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमाअंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत १ ते १५ ऑगस्ट २०२२ या कालावधीत जिल्ह्यातील बचतगटांना मिशन मोडवर कर्ज वितरण करण्यात आले. यासाठी खास कॅम्प आयोजित केले होते. या कालावधीत तब्बल ४३३ बचतगटांना ११ कोटी ७३ लाख रुपयांचा कर्ज पुरवठा करण्यात आला आहे. तर २०२२-२३ या आर्थिक वर्षातील पहिल्या पाच महिन्यात ऑगस्टपर्यंत १११३ बचतगटांना ३१ कोटी ६१ लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. यावर्षी कर्ज वितरण करण्यात जिल्हा राज्यात पाचव्या स्थानी आहे.
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत बचतगटांना व्यवसायासाठी कर्ज वितरीत केले जाते. व्यवसायासाठी कर्जाच्या रूपाने दुसरा व तिसरा डोस दिला जातो. २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी राज्य स्तरावरून सिंधुदुर्ग जिल्ह्याला ३ हजार ४०० बचतगटांना ६५ कोटी रुपये कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यात कार्यरत असलेल्या जिल्हा अभियान कक्षाच्यावतीने नियोजन केले आहे. व्यवसाय करणाऱ्या बचतगटांची निवड करून त्यांचे प्रस्ताव तयार केले जात आहेत. जिल्ह्यातील बचतगटांकडून याला उत्तम प्रतिसाद लाभत आहे. तसेच जिल्ह्यातील विविध बँका सुद्धा चांगल्या प्रकारे सहकार्य करीत आहेत.
आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये या अभियान अंतर्गत जिल्ह्यामध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. उमेद अभियान व जिल्ह्यातील सर्व बँक शाखा यांच्या मार्फत सर्व तालुक्यांत बचतगटांना कर्ज वितरण उपक्रम राबविण्यात आला. बँकेकडून दिल्या जाणाऱ्या कर्जाचा विनियोग महिलांनी गाव स्तरावर विविध सामूहिक व व्यावसायिक फायद्यासाठी करून आपल्या कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ करून स्वावलंबी बनावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. याला सुद्धा बँका व बचतगट यांच्याकडून मोठा प्रतिसाद लाभला. १ ते १५ या कालावधीत मिशन मोडवर हे काम करण्यात आले. यात ४३३ बचतगटांच्या कर्ज प्रस्तावांना मंजुरी मिळाली. तब्बल ११ कोटी ७३ लाख रुपयांचे कर्ज वितरीत करण्यात आले. हे कर्ज प्रस्ताव जिल्ह्यातील बचतगटांना विविध व्यवसायासाठी मंजूर करण्यात आले आहेत. यात काजू प्रक्रिया, मसाले प्रक्रिया, कोकम ज्यूस, मोदक, अगरबत्ती, आईस्क्रीम यांसह अन्य व्यवसायाचा यात समावेश आहे. सरासरी दोन ते तीन लाख रुपयांचे कर्ज वितरण करण्यात आले आहे. काही बचतगटांना दहा लाख रुपयांचे सुद्धा कर्ज वितरण करण्यात आले आहे. यासाठी प्रकल्प संचालक तथा सहजिल्हा अभियान संचालक राजेंद्र पराडकर, जिल्हा अभियान व्यवस्थापक वैभव पवार, आर्थिक समावेशन जिल्हा व्यवस्थापक निलेश वालावलकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक बँक ऑफ इंडिया मुकेश मेश्राम, बँक ऑफ इंडिया कृषी व्यवस्थापक ऋषिकेश गावडे,बँक ऑफ इंडिया व्यवस्थापक किशोर रोडी यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत.
------------
चौकट
बँक ऑफ इंडियाचे योगदान
गेल्या पाच महिन्यात जिल्ह्यातील १११३ बचतगटांना ३१ कोटी ६१ लाख रुपये एवढ्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. यात सर्वात जास्त योगदान बँक ऑफ इंडियाचे आहे. ४३९ बचतगटांना १२ कोटी ८८ लाख ७ हजार रुपये एवढा कर्ज पुरवठा केला आहे. त्या पाठोपाठ एच डी एफ सी बँकेने योगदान दिले आहे. २३४ बचतगटांना ७ कोटी ६४ लाख ७२ हजार रुपये एवढे कर्ज पुरविले आहे. आय सी आय सी बँकेने ६७ बचतगटांना दोन कोटी ११ लाख १७ हजार रुपये एवढे कर्ज पुरविले आहे. बँक ऑफ महाराष्ट्रने ८८ बचतगटांना २ कोटी सहा लाख १५ हजार रुपये एवढे कर्ज वितरण केले आहे.
--------------
चौकट
कर्ज पुरवठ्याचे उद्दिष्ट
उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत २०२२-२३ या आर्थिक वर्षात ३ हजार ४०० बचतगटांना ६५ कोटी रुपये कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट आपल्या जिल्ह्याला मिळाले आहे. यातील पहिल्या पाच महिन्यात जिल्ह्यातील १११३ बचतगटांना ३१ कोटी ६१ लाख रुपये एवढ्या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. आता उर्वरित सात महिन्यात दोन हजार २६९ बचतगटांना ३३ कोटी ३९ लाख रुपये कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट शिल्लक राहिले आहे. हे उद्दिष्ट लवकरच पूर्ण केले जाईल. यावर्षी जास्तीतजास्त बचतगटांना कर्ज वितरण करण्याचा प्रयत्न राहणार आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा अभियान व्यवस्थापक वैभव पवार यांनी दिली.
-------------
पहिल्या पाच महिन्यांतील कर्ज वितरण (बँकनिहाय)
अ.क्र.*बँकेचे नाव*समूह संख्या*रक्कम
१*सिं.जि.मध्य.सह.बँक*२९*५४.५५
२*बँक ऑफ बडोदा*४०*८३.९२
३*बँक ऑफ इंडिया*४३९*१२८८.७
४*बँक ऑफ महाराष्ट्र*८८*२०६.१५
५*कॅनरा बँक*२१*४०.५६
६*सेंट्रल बँक ऑफ इंडिया*३३*१२८.७६
७*स्टेट बँक ऑफ इंडिया*३९*११७.४३
८*युनियन बँक ऑफ इंडिया*६२*१०४.९८
९*विदर्भ कोकण ग्रामीण बँक*६१*१६०.५
१०*एचडीएफसी बँक*२३४*७६४.७२
११*आयसीआयसीआय बँक*६७*२११.१७

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91327 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..