एसटी गणेशोत्सव मोफत प्रवास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटी गणेशोत्सव मोफत प्रवास
एसटी गणेशोत्सव मोफत प्रवास

एसटी गणेशोत्सव मोफत प्रवास

sakal_logo
By

बहुतांश चाकरमान्यांना
यंदा प्रवासाचा ‘प्रसाद’
एसटीला साडेसात कोटींचा महसूल

शिवाजी यादव ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २८ ः गणेशोत्सवाला कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाकडून यंदा तीन हजार ४५० जादा गाड्यांची व्यवस्था आहे. यात भाजप व शिवसेना शिंदे गटानेही चाकरमान्यांसाठी बुकिंग केले. बहुतांश चाकरमान्यांचे पैसेही पक्षीय नेत्यांनी भरले. त्यामुळे चाकरमान्यांचा यंदाच्या गणेशोत्सवात प्रवासाचा ‘प्रसाद’ मिळाला आहे. यातून एसटीला जवळपास साडेसात कोटींचा महसूल मिळेल, असा अंदाज आहे.
मुंबई- कोकण- मुंबई यासाठी एसटी महामंडळ दरवर्षी दोन ते अडीच हजार गाड्यांचे नियोजन करते. त्यानुसार यंदाही तेवढ्याच गाड्याचे नियोजन केले होते. गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे एसटीला जेमतेम महसूल मिळाला होता. यंदा कोरोनाचे निर्बंध नाहीत. त्यात महापालिकांच्या निवडणूक तसेच भाजप विरुद्ध शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस असे तापलेले वातावरण या पार्श्वभूमीवर कोकणवासीयांची मने जिंकण्यासाठी पक्षीय नेत्यांत स्पर्धा लागली.
कोकणसाठी राज्यभरातील अन्य जिल्ह्यातून जवळपास १८०० गाड्या मागविल्या आहेत. कोल्हापुरातून १३० गाड्या मुंबई- कोकण सेवेवर आहेत. या गाड्या कोल्हापुरातून मुंबईला जाताना केवळ दहा- बारा प्रवासी घेऊन गेल्या. येतानाही तेवढेच प्रवासी घेऊन येतील. गाड्या सात दिवस स्‍थानिक सेवेत नसतील. हा सर्व एसटीचा हक्काचा महसूल बुडणार आहे. तो अंदाजे दहा कोटींच्या घरात आहे; मात्र सामाजिक बांधिलकीचा भाग म्हणून एसटीने हाही तोटा सोसत कोकणवासीयांना यंदा ५०० हून अधिक गाड्या जास्त दिल्या आहेत.

यंदाच्या गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने प्रवासी कोकणात जात आहेत. त्यासाठी ३ हजार ४५० च्या एसटीच्या गाड्यासेवेत आहेत. एसटीचे दहा हजार अधिकारी कर्मचारी सुरक्षित प्रवासाचे नियोजन करीत आहेत. यंदा काही राजकीय पक्षांनी गाड्यांची नोंदणी केली. त्याचे पैसेही महामंडळाला भरले. त्यामुळे महसुलात वाढ होईल. अंदाजे साडेसात कोटींचा महसूल मिळेल. एसटीने सक्षम नियोजन केले आहे.
- शिवाजी जगताप, वाहतूक महाव्यवस्थापक, एसटी महामंडळ

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91342 Txt Sindhudurg1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..