पावस-सकाळी गावाची स्वच्छता, दुपारी घरी आगमनाची तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस-सकाळी गावाची स्वच्छता, दुपारी घरी आगमनाची तयारी
पावस-सकाळी गावाची स्वच्छता, दुपारी घरी आगमनाची तयारी

पावस-सकाळी गावाची स्वच्छता, दुपारी घरी आगमनाची तयारी

sakal_logo
By

येई गणेशा--लोगो
...
-rat२९p१९.jpg,
46307

rat२९p२०.jpg
L46327
- पूर्णगड ः सिताबेवाडी ते स्मशानभूमीपर्यंतचा परिसरात स्वच्छता करणारे ग्रामस्थ व महिला.
-----------------
काही सुखद--लोगो
-----
सकाळी गावाची स्वच्छता, दुपारी घरी आगमनाची तयारी

पूर्णगड खारवी समाज परिवर्तन मंचचा उपक्रम; ग्रामस्थांसह महिला सहभागी
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २९ ः आम्ही एक - आमचा गाव एक, आमचा समाज एक या उक्तीप्रमाणे पूर्णगड खारवी समाज परिवर्तन मंचने गणेशोत्सवासाठी गावाची स्वच्छता केली. सकाळी गावाची स्वच्छता, दुपारी घरातील उत्सवाची तयारी ही संकल्पना घेऊन मंचाने काम केल्याने गाव उत्सवासाठी सज्ज झाले आहे. मंगळवारी (ता. ३०) गणरायांचे आगमन होणार असल्याने सर्व गावात उत्साहाचे वातावरण आहे.
पूर्णगड खारवी समाज व गावचा विकास हेच ध्येय हा उपक्रम रविवारी (ता. २८) राबविण्यात आला. गणेशोत्सवाला सुरवात होणार असल्याने सकाळी स्वच्छता गावाची, दुपारी घराची तयारी गणेश उत्सवाची ही संकल्पना घेवून सकाळी ७ वाजता सितापेवाडी ते स्मशानभूमीपर्यंत गाव स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या अभियानाचे उद्घाटन ज्येष्ठ समाजसेवक, लेखक यादव आंबेरकर, रामभाऊ हरचकर, सुभाष तारये, अध्यक्ष राजाराम लाकडे, दिलीप हरचकर, महिला अध्यक्ष रिद्धी आडविरकर, शरयू आंबेरकर, प्रेरणा हरचकर, युगंधरा वाघे, सचिव बबन आडविरकर, आशिष हरचकर, विजय आडविरकर, रवींद्र डोर्लेकर, आदींच्या उपस्थितीत झाले. अध्यक्ष राजाराम नाटेकर, सचिव बबन आडविरकर यांनी सर्वांचे आभार मानले.
पूर्णगड खारवी समाजातील शेकडो ग्रामस्थ, महिला, लहान मुले या मोहिमेत सहभागी झाले होते. अभियानासाठी चहा, नाश्ता विजय आडविरकर यांनी दिला. कटर व्यवस्था गणेश लाकडे यांनी केली. कुठल्याही प्रकारची जाहिरात न करता केवळ पूर्णगड खारवी समाजाच्या व्हॉटस अॅपद्वारे या अभियानाचे आयोजन व आवाहन करण्यात आले होते. त्याला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
....
चौकट
स्वागतासाठी आरासाची निर्मिती
सकाळपासून दुपारपर्यंत श्रमदानातून संपूर्ण गावाची स्वच्छता केली. गवत, पालापाचोळा, बाटल्या, रस्ते स्वच्छ करण्यात आले. दुपारनंतर ग्रामस्थांनी आपापल्या घरी जाऊन गणरायांच्या स्वागतासाठी आरासाची तयारी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91432 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..