रवळनाथ फायनान्स सोसायटीतर्फे कुडाळात सत्कार, गौरव सोहळा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रवळनाथ फायनान्स सोसायटीतर्फे
कुडाळात सत्कार, गौरव सोहळा
रवळनाथ फायनान्स सोसायटीतर्फे कुडाळात सत्कार, गौरव सोहळा

रवळनाथ फायनान्स सोसायटीतर्फे कुडाळात सत्कार, गौरव सोहळा

sakal_logo
By

swt२९५.jpg
४६३१३
कुडाळ ः श्री रवळनाथ को. ऑप. हौसिंग फायनान्स शाखा कुडाळच्या वतीने सत्कारमूर्तींसमवेत बाबासाहेब आजरी, सुहास नाडगौडा, एम. एल. चौगुले, व्ही. के. मायदेव, अशोक येजरे. (छायाचित्रः अजय सावंत)

रवळनाथ सोसायटीतर्फे कुडाळात सत्कार, गौरव सोहळा
सकाळ वृत्तसेवा
कुडाळ, ता. २९ ः श्री रवळनाथ को ऑप हौसिंग फायनान्स सोसायटी लि. आजरा मल्टिस्टेट शाखा कुडाळच्यावतीने सेवानिवृत्त सभासद सत्कार, विद्यार्थी गौरव व ७५ वर्षे पूर्ण केलेल्या सभासदांचा सत्कार आदी कार्यक्रमांचे आयोजन संस्थेच्या सभागृहात केले होते.
यावेळी पुणेचे सेवानिवृत्त प्रादेशिक परिवहन अधिकारी बाबासाहेब आजरी, पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सेवानिवृत्त अप्पर पोलिस अधीक्षक सुहास नाडगौडा, रवळनाथचे संस्थापक अध्यक्ष एम. एल. चौगुले, उपाध्यक्ष व्ही. के. मायदेव, संचालक दत्तात्रय पाटील, महेश मजती, डॉ. रामचंद्र निळपणकर, संदीप कागवाडे, कुडाळ शाखा चेअरमन अशोक येजरे, माजी चेअरमन डॉ. श्रीकांत सावंत, संचालक सीए सागर तेली, मनोहर गुरबे, डॉ. एस. टी. आवटे, रुपाली शिरसाट, सानिका मदने, शाखाधिकारी विक्रम जांभेकर, सभासद ग्राहक कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त सभासद सत्कार विद्यार्थी गौरव व ७५ वर्षे पूर्ण केलेल्या सभासदांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांमध्ये सायली वेंगुर्लेकर (बीएएमएस), सेवानिवृत्त सभासद सत्कारामध्ये
प्रियांका बालम (शिक्षिका-जि.प. शाळा वेतोरे नं.१), अपूर्वा चव्हाण, संजय कात्रे (दोन्ही शिक्षक-श्री वासुदेवानंद सरस्वती विद्यालय, माणगाव), स्वाती वालावलकर (मुख्याध्यापिका-श्री देवी सातेरी हायस्कूल आणि ज्युनिअर कॉलेज, वेतोरे), अशोक राणे (शिक्षक डिगस हायस्कूल)
मीनाक्षी शिरसेकर (शिक्षिका जि. प. शाळा, बांब), रवींद्र चव्हाण (शिक्षक साळगाव हायस्कूल), केशव पेडणेकर (लिपिक-मांडकुली हायस्कूल), पंच्याहत्तरी पूर्ण केलेले सभासदांमध्ये श्रीपाद गिरसागर (मालवण), वसंत नाईक (तुळसुली), रमेश मिसाळ (मालवण), मधुकर सरमळकर (सरंबळ) यांचा समावेश होता तसेच स्टेट ऑर्गन अँड टिश्यु ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन, (SOTTO) गोवा मेडिकल कॉलेज यांच्या मार्फत जागतिक अवयवदान दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय पातळीवर (ऑनलाईन) आयोजित घोषवाक्य स्पर्धेत देशात द्वितीय क्रमांक रवळनाथचे कुडाळ शाखाधिकारी विक्रम जांभेकर यांनी मिळविला. त्यांचे घोषवाक्य ''चला करू अवयव दान, जीवन होईल अतिशय महान'' हे घोषवाक्य होते. हे घोषवाक्य गोवा राज्यामार्फत सार्वजनिक ठिकाणी प्रकाशित करण्यात येणार आहे. त्यांचासुद्धा सत्कार यावेळी करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91437 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..