सातार्डा येथे मंत्र्यांचे स्वागत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सातार्डा येथे
मंत्र्यांचे स्वागत
सातार्डा येथे मंत्र्यांचे स्वागत

सातार्डा येथे मंत्र्यांचे स्वागत

sakal_logo
By

सातार्डा येथे
मंत्र्यांचे स्वागत
सावंतवाडी ः सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे सातार्डा येथे भाजपतर्फे स्वागत करण्यात आले. यावेळी चव्हाण यांनी येथील बंद पडलेल्या उत्तम स्टीलचा कारखाना सुरू होण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगितले. जिल्ह्यातील अनेक युवक-युवती आज गोवा व अन्य शहरांमध्ये रोजगारासाठी जातात; मात्र हा प्रकल्प सुरू झाल्यास अनेकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.’’ भाजपचे युवा पदाधिकारी गोविंद प्रभू यांनी मंत्र्यांचे स्वागत केले. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, सातार्डा विभागीय अध्यक्ष ज्ञानदीप राऊळ, कार्यकर्ते आपा घाडी, सूरज राऊळ, वासुदेव राऊळ, युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी, कमलेश ठाकूर, एकनाथ तेली, मधुकर पालयेकर, रामा मराठे, रामविश्वास मराठे, साई तेली, लवू स्वार आदी उपस्थित होते.
------------
हळबे येथे
गणेशोत्सव
दोडामार्ग ः हळबे महाविद्यालय हॉटेल मॅनेजमेंट विभागातर्फे एकदिवसीय गणेशोत्सव साजरा करण्यात आला. समाजात एकोपा व संस्कृतीचे दर्शन घडवण्यासाठी लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची सुरवात केली. महाराष्ट्रातील गणेशोत्सव हा अतिशय लोकप्रिय सण असून विशेषकरून कोकणात घरगुती गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येते. तसेच सार्वजनिक गणपतीचेसुद्धा पूजन करण्यात येते. ही संकल्पना घेऊन हळबे महाविद्यालयाच्या हॉटेल मॅनेजमेंट विभागाच्या वतीने प्रथमच एकदिवसीय गणपती उत्सव धुमधडाक्यात साजरा केला. या विभागाचे प्रमुख कौशिक शेट्ये यांच्या हस्ते विधी व पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी आरती, भजने व फुगड्या असे कार्यक्रम केले. प्राचार्य डॉ. सुभाष सावंत, रोहन बागकर आणि अशिता नाईक आदी उपस्थित होते.
-------------
वाहतुकीचे
चोख नियोजन
दोडामार्ग ः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोडामार्गात वाहतुकीचे चोख नियोजन करण्यात आले आहे. नगरपंचायत, पोलिस व व्यापारी या तिघांच्या माध्यमातून हे नियोजन केले असून नगराध्यक्ष चेतन चव्हाण यांनी रविवारी सकाळी स्वत: बाजारपेठेतील फिरत्या विक्रेत्यांची बैठक व्यवस्था केली. दरवर्षी दोडामार्ग बाजारपेठेत चतुर्थी कालावधीत तोबा गर्दी उसळते. ते लक्षात घेऊन नगराध्यक्ष चव्हाण यांनी नगरपंचायतीच्या माध्यमातून वाहतुकीचे विशेष नियोजन केले आहे. गांधी चौकापासून निघणाऱ्या चारही प्रमुख मार्गांवर दुचाकी व चारचाकीसाठी पार्किंग व्यवस्था आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91441 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..