बँकेच्या यशात देसाईंचे योगदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बँकेच्या यशात देसाईंचे योगदान
बँकेच्या यशात देसाईंचे योगदान

बँकेच्या यशात देसाईंचे योगदान

sakal_logo
By

46314
सिंधुदुर्गनगरी ः अनिरुद्ध देसाई यांचा सत्कार करताना नीतेश राणे, मनीष दळवी आदी.

बँकेच्या यशात देसाईंचे योगदान

आमदार नीतेश राणे ः सिंधुदुर्गनगरीत ‘स्नेह संवाद’ कार्यक्रम

सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. २९ ः अनिरुद्ध देसाई आणि सिंधुदुर्ग बँक हे एक समीकरण बनलेले होते. बँकेच्या यशात देसाई यांचे महत्त्वाचे योगदान आहे. देसाई नसते तर कदाचित एवढे पुरस्कार बँकेला मिळाले नसते, असे गौरवोद्‌गार आमदार व बँकेचे संचालक नीतेश राणे यांनी काढले.
जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांकडून अनिरुद्ध देसाई यांचा ‘स्नेह संवाद’ कार्यक्रम ओरोस येथील शिक्षक पतपेढी हॉलमध्ये झाला. कार्यक्रमास आमदार राणे, बँकेचे चेअरमन मनीष दळवी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे आदी उपस्थित होते. यावेळी आमदार राणे यांनी देसाई यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कर्मचाऱ्यांच्यावतीने व स्टाफ सोसायटीच्यावतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास बँक कर्मचारी व सहकार क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्या प्रकारे शेतकऱ्यांना केद्रबिंदू ठेवून देसाईंनी काम केले, त्यामुळे बँकेच्या पुरस्कारांच्या यादीत बँकेचा नावलौकिक वाढवला. त्यांनी ज्या प्रकारे संघर्ष करत स्वतःला घडवले व आपले नाव बँकिंग क्षेत्रात बिंबवले, ते उल्लेखनीय असून जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील मान्यवरांच्या यादीत देसाई यांचे नाव ठळकपणे घ्यावे लागेल. जसे तुम्ही यशस्वी झालात, तसे मार्गदर्शन आम्हाला केले तर आम्हीही राजकारणात यशस्वी होऊ, असे आमदार राणे म्हणाले.
..................
‘यशाचे श्रेय देसाईंना’
जिल्हा बँकेच्या वाटचालीतला महत्त्वाचा व भावनाविवश करणारा आजचा प्रसंग आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक राज्यात पहिल्या चारात गणली जाते, याचे श्रेय देसाईंनाही जाते. दिलेल्या जबाबदारीतून ते लौकिकाला साजेसे काम करतील, अशी खात्री आहे, असे उद्‍गार यावेळी जिल्हा बॅंक अध्यक्ष दळवी यांनी काढले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91442 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..