गुहागर ः आधी शासनात समाविष्ट करा मग धान्य बंद करा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुहागर ः  आधी शासनात समाविष्ट करा मग धान्य बंद करा
गुहागर ः आधी शासनात समाविष्ट करा मग धान्य बंद करा

गुहागर ः आधी शासनात समाविष्ट करा मग धान्य बंद करा

sakal_logo
By

-rat२९p८.jpg
L46281
गुहागर ः तहसीलदारांना निवेदन देताना अंगणवाडी कर्मचारी सभेच्या सदस्या.
-----------------
शासकीय सेवेत घ्या मगच धान्य बंद करा

अंगणवाडी सेविकांनी गुहागर तहसीलदारांना दिले निवेदन
सकाळ वृत्तसेवा
गुहागर, ता. २९ ः अंगणवाडी सेविकांच्या कुटुंबांना रास्त धान्य दुकानांमधून मिळणारे धान्य चालू ठेवावे, असे निवेदन तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी सभा या संस्थेने तहसीलदारांना दिले आहे.
गेली दोन वर्षे आम्हाला शासनामध्ये सामावून घ्यावे. शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे पगार व इतर भत्ते मिळावेत, म्हणून आंदोलन करत आहोत. आमची ही मागणी पूर्ण झालेली नाही; परंतु तेच शासन आम्हाला शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे समजून धान्य बंद करण्याचे आदेश देत आहे, हे योग्य नाही. या आदेशांची अंमलबजावणी करण्यापूर्वी आम्हा सर्वांना शासनाने शासकीय सेवेत सामावून घ्यावे, शासनाप्रमाणे पगार द्यावा, नंतर वरील आदेशांची कार्यवाही करावी, अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी सभेच्या गुहागर शाखेच्या अध्यक्षा सारिका हळदणकर यांनी केली आहे.
तालुक्यातील कोतवाल, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, बीएमसी पेन्शनधारक आदी शासकीय नोकरीत असणाऱ्या किंवा मानधन घेणाऱ्या व्यक्ती रेशनकार्डाद्वारे शासकीय अन्नधान्य योजनेचा लाभ घेत असल्यास त्यांचा लाभ त्वरित थांबवावा, असे आदेश तहसीलदार वराळे यांनी रास्तभाव धान्य दुकानदारांना ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीला दिले होते. तसेच अशा लाभ घेणाऱ्या शिधापत्रिकाधारकांना तहसील कार्यालयात संपर्क साधण्यास सांगण्यात आले होते.
या संदर्भात प्रथमच अंगणवाडी सेविकांच्या संस्थेने संघटित होऊन आवाज उठवला. अंगणवाडी कर्मचारी सभा महाराष्ट्र या संघटनेच्या गुहागर शाखेने तहसीलदारांना निवेदन दिले. हे निवेदन देताना सपना विचारे, संध्या आंब्रे, वैभवी विचारे, मयुरी रांजाणे, श्वेता दवेकर आणि शुभांगी वणे या अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होत्या.
..
चौकट
मानधनही वेळेवर मिळत नाही
एकात्मिक बालविकास सेवा योजनेंतर्गत अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांची भरती करताना विधवा, परितक्त्या, अपंग, दारिद्र्यरेषेखालील महिलांना प्राधान्य दिले जाते. या महिला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस म्हणून अत्यंत तुटपुंज्या मानधनावर काम करतात. हे मानधनही शासनाकडून वेळेवर मिळत नाही. वाढत्या महागाईमुळे त्यांना धान्याची गरज आहे. त्याचप्रमाणे २०११ पासून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांचा सर्व्हे २०११ पासून झालेला नाही. गेली १० ते १५ वर्ष ए.बी.ल. धारकांना १ किलो धान्यही मिळत नाही. त्यामुळे रास्त दराच्या धान्य दुकानातून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणारे धान्य मिळत राहावे, अशी मागणी केली.
----------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91454 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..