फुले जनआरोग्य योजनेला लांजा तालुका वंचित | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुले जनआरोग्य योजनेला लांजा तालुका वंचित
फुले जनआरोग्य योजनेला लांजा तालुका वंचित

फुले जनआरोग्य योजनेला लांजा तालुका वंचित

sakal_logo
By

फुले जनआरोग्य योजनेला
लांजा तालुका वंचित
एकही हॉस्पिटल नाही ; गोरगरीब जनतेने जायचे कोठे
लांजा, ता. २९ः महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत आजतागायत लांजा तालुक्यात एकही हॉस्पिटल उपलब्ध नाही. त्यामुळे या योजनेचा फायदा तालुक्यातील गोरगरीब जनतेला होताना दिसत नाही. अशाचवेळी लांजा तालुक्याचा सर्वे करून लवकरात लवकर या ठिकाणी हॉस्पिटल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी लांजा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने रत्नागिरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना केली आहे.
तालुक्यामध्ये जवळपास दोन लाखापेक्षा अधिक लोकवस्ती असताना शासनाने खास गोरगरीब जनतेसाठी काढलेली महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना लांजा तालुक्यात निरूपयोगी ठरत आहे. कारण लांजा तालुक्यात मात्र यासाठी एकही हॉस्पिटल उपलब्ध नसल्याने तालुक्यातील गोरगरीब जनतेला या आरोग्यविषयक सुविधेचा लाभ मिळताना दिसत नाही.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी येथील रुग्णाला जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा परजिल्ह्यात जावे लागत आहे. कोकणात विशेषतः डोंगरी भाग असल्याने सर्व स्तरातील लोकांना बाहेरगावी जाऊन उपचार करणे शक्य होत नाही. डायलेसिससारख्या रुग्णांना उपचारपद्धतीसाठी अव्वाच्यासवा रक्कम मोजावी लागत असल्याने अनेकांना याचा आर्थिक भूर्दंड सोसावा लागत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेऊन तालुक्यामध्ये महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेसाठी तालुक्याच्या ठिकाणी हॉस्पिटल उपलब्ध करून द्यावे, अशी विनंती लांजा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने करण्यात आली आहे, अशी माहिती राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अभिजित राजेशिर्के यांनी दिली.
----------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91538 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..