राजापूर ः श्रीगणेशाच्या स्वागतासाठी फुलला अवघा निसर्ग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राजापूर ः श्रीगणेशाच्या स्वागतासाठी फुलला अवघा निसर्ग
राजापूर ः श्रीगणेशाच्या स्वागतासाठी फुलला अवघा निसर्ग

राजापूर ः श्रीगणेशाच्या स्वागतासाठी फुलला अवघा निसर्ग

sakal_logo
By

-rat२९p२२.jpg
४६३०१
ः सारवड
-----
-rat२९p२३.jpg
L४६३०२
ः कवंडल.
-----
-rat२९p२४.jpg
४६३०३
ः कांगली किंवा कांगण्या
-----
-rat२९p२५.jpg
L४६३०४
ः कळलावी
-----
-rat२९p२६.jpg
४६३०५
ः रानतिरडा
--------------
कोकणचा निसर्ग फुलला; श्रींच्या स्वागताला आतुरला

गणेशोत्सवातील आराशीतही लयलूट; हिरव्या गालिचावर रंगांची पखरण
सकाळ वृत्तसेवा
राजापूर, ता. २९ ः अवघे कोकण चैतन्यमय करणारा श्रीचा उत्सव अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपलेला असताना गणेशोत्सवाच्या आरासासाठी वापरली जाणारी रंगीबेरंगी फुले श्रावणामध्ये चांगलीच फुलली अन् खुलली आहेत. त्यामध्ये निसर्गामध्ये बहरलेला रानतिरडा, सोनतळ, कळलावी, पांढऱ्‍या शुभ्र पानांची सारवड, कवंडल सध्या साऱ्‍यांचे लक्ष वेधून घेत आहेत. श्रीगणेशाच्या स्वागतासाठी अवघा निसर्गही फुलल्याचे चित्र दिसत आहे.
निसर्गाची दैवी देणगी लाभलेल्या कोकणच्या निसर्गाने श्रावणामध्ये सध्या सौंदर्याचे वेगळे रूप आपलेसे केले आहे. अन्यवेळी काळे तुळतुळीत अन् शुष्क दिसणाऱ्या कातळाने सध्या हिरवागार शालू अंगावर पांघरला आहे. त्या हिरव्या गालिचावर इवलीशी निळी, जांभळी, पांढरी रंगबेरंगी फुले साऱ्‍यांचे लक्ष वेधून घेत नसतील तर नवलंच. रानफुलांनी बहरलेल्या निसर्गामध्ये भुरूभुरू पडणार्‍या पावसामध्ये मध्येच आडवा येणारा इंद्रधनुष्य निसर्ग सौंदर्याला चार ‘चाँद’ लावून जात आहे. आल्हाददायक वातावरण आणि दिवसागणिक सरत असलेल्या श्रावण महिन्यात बहरलेली रानफुले साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत. श्रावण महिन्यामध्ये बहरलेले हे निसर्गसौंदर्यही सध्या जणूकाही साऱ्‍यांच्या लाडक्या गणेशाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
...
चौकट
‘कलर कॉम्बिनेशन’ ..
गणेशोत्सवामध्ये श्री गणेशाच्या आरासासाठी विविध वनस्पतींच्या फुलांची आरास करण्याची प्रथा आहे. त्यामध्ये विशेषकरून पिवळ्या गडद रंगाच्या सोनतळीपासून तीन रंगाचा असलेला रानतिरडा, आयुर्वेदिक औषध म्हणूनही ज्याचा उपयोग केला जातो त्या कळलावी आदी फुलांचा समावेश आहे. त्याच्या जोडीला कवंडल या फळासह केवळ हिरव्या आणि पांढऱ्‍या रंगांचे ‘कलर कॉम्बिनेशन’ असलेल्या पानांच्या सारवडचाही उपयोग केला जातो. गणेशोत्सवाच्या आराशीसह सजावटीसाठी वापरण्यात येत असलेली ही रानफुले आणि वनस्पतींची पाने सध्या चांगलीच बहरली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91539 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..