अवैध बांधकामप्रकरणी संशयिताची मुक्तता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अवैध बांधकामप्रकरणी
संशयिताची मुक्तता
अवैध बांधकामप्रकरणी संशयिताची मुक्तता

अवैध बांधकामप्रकरणी संशयिताची मुक्तता

sakal_logo
By

अवैध बांधकामप्रकरणी
संशयिताची मुक्तता
कुडाळ, ता. २९ ः भटवाडी-वेंगुर्ले येथील विजय बाबली परब याने पालिकेची परवानगी न घेता बेकायदेशीर बांधकाम केले म्हणून वेंगुर्ले पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. वेंगुर्ले प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी के. के. पाटील यांनी सबळ पुराव्याअभावी संशयिताची या गुन्ह्यातून मुक्तता केली.
संशयितातर्फे अॅड. अजित भणगे, अॅड. सुनील मालवणकर व अॅड. स्वप्ना सामंत यांनी काम पाहिले. याबाबत वेंगुर्ले पालिकेत फिल्टर ऑपरेटर म्हणून काम करणारे व बांधकाम विभाग प्रमुखाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आलेले जयेंद्र शिवराम चौधरी यांनी वेंगुर्ले पोलिसांत फिर्याद दिली होती. भटवाडी-वेंगुर्ले येथील सुनील पालकर यांनी २४ जलै २०१७ ला आरोपी विजय परब याने त्यांच्या मालकीच्या जागेत बेकायदेशीर बांधकाम केल्याचा अर्ज केला होता. त्यानुसार वेंगुर्ले पोलिसांनी संशयिताविरुध्द वेंगुर्ले न्यायालयात खटला दाखल केला. या प्रकरणी फिर्यादी पक्षातर्फे तपासी अंमलदारासह एकूण ४ साक्षीदार तपासण्यात आले. साक्षी पुराव्यावरुन संशयिताने बेकायदेशीर बांधकाम केल्याचे सिद्ध न झाल्यामुळे त्याची या गुन्ह्यातून सबळ पुराव्याअभावी मुक्तता झाली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91545 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..