खेड ः 17 सार्वजनिकसह 13 हजार घरगुती गणेशमूर्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड ः 17 सार्वजनिकसह 13 हजार घरगुती गणेशमूर्ती
खेड ः 17 सार्वजनिकसह 13 हजार घरगुती गणेशमूर्ती

खेड ः 17 सार्वजनिकसह 13 हजार घरगुती गणेशमूर्ती

sakal_logo
By

येई गणेशाः लोगो
.......
खेडमध्ये १३ हजार घरगुती
गणेशमूर्तींची होणार प्रतिष्ठापना
सकाळ वृत्तसेवा
खेड, ता. २९ ः गणरायाचे आगमन अवघ्या एक दिवसावर येऊन ठेपले असून शहरासह ग्रामीण भागातील १७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तीसह १३ हजाराहून अधिक घरगुती गणेशमूर्तींची ३१ ऑगस्टला गणेश चतुर्थीदिनी प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. गणरायाला विराजमान करण्यासाठी घरगुती आरासासह सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून मंडपाच्या निर्मितीची जय्यत तयारी अंतिम टप्प्यात आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये शहरातील मुरली मनोहर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ गुजर आळी, शिवसेना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तीनबत्ती नाका, खेड बसस्थानक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, वडार समाज सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ महात्मा फुले नगर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गणपती छत्रपती शिवाजी महाराज चौक, टायटनचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ शिवतर रोड, नातूवाडी प्रकल्प सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भरणे, महाराष्ट्र बेलदार संघटना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भरणे, वडार समाज युवक मंडळ भरणे पुरस्कृत जय गणेशमित्र मंडळ भरणे, संघर्ष मित्रमंडळ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ भरणेनाका, वडार समाज संघटना सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ दस्तुरी -चिंचघर, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आंबवली, गणेश मित्रमंडळ कळंबणी बुद्रुक, जय हिंद गणेश मित्रमंडळ घाणेखुंट, एमआयडीसी गणेशोत्सव मंडळ पिरलोटे, अग्निशमन कर्मचारी गणेश मंडळ वेरळ आदींचा समावेश आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91561 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..