दाभोळ-गणपती संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ-गणपती संक्षिप्त
दाभोळ-गणपती संक्षिप्त

दाभोळ-गणपती संक्षिप्त

sakal_logo
By

-rat29p46.jpg
46408
- दापोली ः विद्याभारती शिशुवाटिकेत गणरायांना वाजत गाजत आणताना शिक्षक, विद्यार्थी.
-----------
विद्याभारती शिशुवाटिकेत
गणरायांचे जल्लोषात आगमन
दाभोळ ः दापोली एज्युकेशन सोसायटी संचलित विद्याभारती शिशुवाटिका व प्राथमिक विभागात गणेशोत्सव साजरा करण्यात आला. सकाळी वाद्यांच्या गजरात व गणेशाच्या नामगजरात गणेशाचे आगमन झाले. विद्यार्थ्यांनी जोरात घोषणा देत उत्साहात नामगजर केला. अश्विनी सावंत यांनी वर्गाच्या दारात दूध, पाण्याने पाय धुवून गणेशाचे औक्षण केले. त्यानंतर सजवलेल्या मखरात गणेशाची स्थापना करण्यात आली. विद्याभारती विभागप्रमुख निकिता परब यांच्या हस्ते गणेशपूजन करण्यात आले. या वेळी प्राथमिकचे मुख्याध्यापक अनिल शेठ व वा. ना. दांडेकर बालक मंदिराच्या मुख्याध्यापिका श्रुती आंबर्डेकर उपस्थित होत्या. त्यांनी गणेशदर्शन घेतले. सर्वांनी आरती केली. त्यानंतर शिशुवाटिकेच्या विद्यार्थ्यांनी दर्शन घेतले. प्रसाद वाटप करण्यात आले. दुपारच्या सत्रात पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे गुणदर्शन कार्यक्रम झाले. रमेश नवरत व त्यांच्या विद्यार्थ्यांनी भजन सादर केले. ढोलकीसाथ अभिषेक बुरटे व पेटीसाथ नंदिता पतंगे यांनी केली.
-------------
दाभोळमधील गणेश कारखान्यात लगबग
दाभोळ ः गणेशोत्सव थोड्या दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे दाभोळमध्ये गणेशमूर्ती बनवणाऱ्‍या कारखान्यांमध्ये मूर्तीवर रंगाचा शेवटचा हात फिरवण्यासाठी कारागिरांची लगबग सुरू आहे. वेगवेगळ्या आकाराच्या वेगवेगळ्या रंगांनी रंगवलेल्या गणेशमूर्ती सध्या कारखान्यांमध्ये तयार होताना पाहावयास मिळत आहेत. ३१ ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरवात होत आहे. उत्सवप्रिय कोकणात हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. घरोघरी लाडक्या गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली जाते. दाभोळमध्ये एकच सार्वजनिक गणेशोत्सवाची मूर्ती आहे. तेथे उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो. सध्या गणेशमूर्ती बनवण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून मूर्तिकार गणेशमूर्तीवर अखेरचा रंगकामाचा हात फिरवताना दिसत आहेत. दाभोळ गावात सहा गणपती कारखान्यात गणपतीचे काम अंतिम टप्प्याकडे नेण्याचे काम सुरू आहे. गणेशमूर्ती भाविकांच्या घरी जाण्यासाठी तयार आहेत.
-----------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91566 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..