दाभोळ ः कोल्हापुरातून दापोलीत येऊन 35 वर्षे संगीतसेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दाभोळ ः कोल्हापुरातून दापोलीत येऊन 35 वर्षे संगीतसेवा
दाभोळ ः कोल्हापुरातून दापोलीत येऊन 35 वर्षे संगीतसेवा

दाभोळ ः कोल्हापुरातून दापोलीत येऊन 35 वर्षे संगीतसेवा

sakal_logo
By

कोल्हापुरातून दापोलीत
येऊन ३५ वर्षे संगीतसेवा
मंजुनाथ गणाचार कुटुंबीय ; श्रोते होतात मंत्रमुग्ध
दाभोळ, ता. २९ ः गणरायाच्या आगमनाच्या सुश्राव्य भजनांनी दापोली बाजारपेठ रंगून गेली. रागदारी गाणारे तीन भजनीबुवांचे हे पथक उदरनिर्वाहासाठी थेट कोल्हापूरहून दापोलीत आलेले आहे. दापोलीत दरवर्षी गणपती आगमनाच्या कालावधीत विविध कलाकार, संगीतमय वाद्य वाजवणारे तसेच ढोलकी विक्रीसाठी विविध ठिकाणाहून लोक येतात. यातच कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील पिंपळगाव येथील मंजुनाथ गणाचार यांचे कुटुंबीय गेली ३५ वर्षे दापोलीत येऊन संगीतसेवा देत आहेत.
तबला, संगीतपेटी, टाळ या वाद्यांच्या मदतीने ते सुमधूर गायन करतात. त्यांचे संगीत सुरू झाल्यानंतर समोर असणार्‍या व्यक्तींच्या चेहर्‍यावर वेगळाच आनंद दिसून येतो. गणाचार यांच्या सुमधूर अशा गीतगायनावर आनंदी होत त्यांना नागरिक बक्षीसेदेखील देतात. मंजुनाथ गणाचार यांची आधीची पिढी नाटक करत तसेच संगीत सादर करत असे. हीच पिढ्यानपिढ्या चालत आलेली संगीतमय सेवा आजही हे कुटुंबीय जोपासत आहेत. त्यातूनच वेळ काढून हे कुटुंबीय दापोलीत येत उदरनिर्वाहासाठी आपली कला सादर करतात. ते जालगाव, आंजर्ले, केळशी, बुरोंडी, हर्णै आदी गावांमध्ये जाऊन आपली कला सादर करत असल्याचे व हा सारा खटाटोप उदरनिर्वाहासाठी असल्याचे गणाचार यांनी सांगितले. यावर्षीदेखील मंजुनाथ गणाचार, व्यंकटेश गणाचार, सुरेश गणाचार हे दापोलीत आले आहेत आणि आपली कला संगीतमय वाद्यांसह सुमधूर आवाजात सादर करत आहेत. त्यांचे सुमधूर संगीत, गायन ऐकून श्रोते अगदी मंत्रमुग्ध होत असून त्यांच्या कलेचे दापोलीत कौतुक होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91568 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..