संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

-rat२९p४०.jpg,
46393
ः साडवलीः देवरूखमधील गणेश मूर्तिकारांचा सन्मान करताना राजू काकडे हेल्प अॅकॅडमीचे कार्यकर्ते.
---------
देवरूखमधील मूर्तिकारांचा गौरव
साडवली ः पर्यावरणाला बाधा ठरणाऱ्‍या पीओपीचा वापर न करता शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती करण्यावर देवरूखमधील गणेशमूर्तिकारांचा विशेष भर आहे. सामाजिकतेचे भान ठेवून हे कलाकार काम करत आहेत. अशा मूर्तिकारांचे कौतुक राजू काकडे हेल्प अॅकॅडमीतर्फे करण्यात आले. पाण्यात सहज विरघळून जाईल, अशी गणेशमूर्ती व साधे रंग वापरत या गणेशमूर्ती तयार करण्यात आल्या आहेत. देवरूखमधील उदय भिडे व दिलीप कारेकर गेली ३० वर्ष मातीकामासाठीच प्रसिद्ध आहेत तसेच प्रमोद पाटेकर, आशिष बेलवलकर, प्रा. अवधूत पोटफोडे हे कलाकार चित्रकार व मूर्तिकार म्हणून प्रसिद्ध आहेत. या सर्वांना भेटवस्तू व शैलेश भस्मे यांच्या सह्याद्री उत्पादनाचे मोदक देऊन विशेष सन्मान करण्यात आला. या वेळी युयुत्सू आर्ते, प्रमोद हर्डीकर, अण्णा बेर्डे, जयवंत वाइरकर, डॉ. सुनील दैठणकर, विनायक कदम, संदेश रेडीज, अक्षय जोशी आदी उपस्थित होते. आमच्यासारख्या कलाकारांची अॅकॅडमीने दखल घेतली याबद्दल उदय भिडे, अवधूत पोटफोडे यांनी आनंद व्यक्त केला.
-------------
देवरूख उपनगराध्यक्षपदी कदम बिनविरोध
साडवली ः देवरूख नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षपदी वैभव कदम यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. २५ जुलैला मनसेच्या सान्वी संसारे यांनी त्यांच्या वैयक्तिक कारणास्तव उपनगराध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. यानंतर उपनगराध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते, याकडे समस्त देवरूखवासियांचे लक्ष लागले होते. सोमवारी उपनगराध्यक्षपदी वैभव कदम यांची बिनविरोध निवड झाली. या वेळी नगराध्यक्षा मृणाल शेट्ये, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद अधटराव, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अभिजित शेट्ये, भाजपाचे ज्येष्ठ नेते मुकुंद जोशी, आणि सर्व नगरसेवक उपस्थित होते.
----------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91569 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..