गुहागर ः धोपावेच्या मंगलेश जिंकली मॅरेथॉन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुहागर ः धोपावेच्या मंगलेश जिंकली मॅरेथॉन
गुहागर ः धोपावेच्या मंगलेश जिंकली मॅरेथॉन

गुहागर ः धोपावेच्या मंगलेश जिंकली मॅरेथॉन

sakal_logo
By

rat२९p४४.jpg ः
L४६३९७
मंगलेश कोळथरकर
------------
धोपावेच्या मंगलेश जिंकली मॅरेथॉन
गुहागर, ता. २९ः पालघर जिल्ह्यातील मुंबई कोकण वर्षा मॅरेथॉन स्पर्धेत धोपावेमधील मंगलेश कोळथरकर याने प्रथम क्रमांक पटकावला. ही स्पर्धा जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्थेकडून भरवली होती. राज्यभरातील ८ हजार ५०० स्पर्धकांनी यामध्ये भाग घेतला होता.
ही कोकणातील सर्वात मोठी स्पर्धा म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्राच्या क्रीडा नकाशावर पालघर जिल्ह्याला गाजवत ठेवणाऱ्या मुंबई कोकण वर्षा मॅरेथॉन स्पर्धा सात वर्षापूर्वीपासून सुरू आहे. तालुक्यातील धोपावेचा, खारवी समाज सुपुत्र मंगलेश अनिल कोळथरकर याने २१ किमीचे अंतर १ तास ३३ मिनिटांत पूर्ण केले. त्याने स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्याबद्दल त्याचे, त्याच्या मार्गदर्शक शिक्षकांचे व पालकांचे कर्तव्य ग्रुप कुडली यांसकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
मंगलेश कोळथरकर याने शिक्षण घेताना वेगळं काहीतरी करावं म्हणून तो धावू लागला. स्पर्धेत भाग घेताना क्षमता कशी टिकवायची, संतुलित आहार कोणता घ्यावा, प्रत्यक्ष धावताना ऊर्जा येण्यासाठी आपण कधी व किती प्रमाणात ऊर्जा देणारे पेय घ्यावे आदी गोष्टी तो स्वत:च शिकला. मैदानावर धावताना त्याला धावण्याचा छंद लागला. या छंदापोटी गेली दोन ते तीन वर्षे मंगलेश धोपावे ते तळी रस्त्यावर धावण्याचा सराव करत असे. मॅरेथॉन पूर्ण करण्याचे त्याचे लक्ष्य होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91570 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..