रत्नागिरी-हातखंब्यातील चित्रशाळेत लगबग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-हातखंब्यातील चित्रशाळेत लगबग
रत्नागिरी-हातखंब्यातील चित्रशाळेत लगबग

रत्नागिरी-हातखंब्यातील चित्रशाळेत लगबग

sakal_logo
By

rat29p35.jpg-
L46355
रत्नागिरी - हातखंबा येथील श्री कृपा आर्ट या मूर्तिशाळेतही गणेशमूर्तीवर अंतिम हात फिरवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
-------------
हातखंब्यातील चित्रशाळेत लगबग
बाहेरगावातून मागणी ; रंगरंगोटी अंतिम टप्प्यात
रत्नागिरी, ता. २९ः लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांच्या लाडक्या गणपती बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी सुरू आहे. शहराजवळील हातखंबा येथील श्री कृपा आर्ट या मूर्तिशाळेतही गणेशमूर्तीवर अंतिम हात फिरवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.
विशेष म्हणजे अलिबाग, चिपळूण, साखरपा, आडिवरे आदी विविध ठिकाणाहून मूर्तीच्या ऑर्डर यावर्षी श्री कृपा आर्टला मिळाल्या आहेत.
गणेश चतुर्थीच्या दिवशी विराजमान होणाऱ्या बाप्पाची मूर्ती घडवण्याची तयारी गेल्या तीन-चार महिन्यांपासूनच सुरू आहे. हातखंबातील श्री कृपा आर्टमधील मूर्ती घडवण्याचे काम करणारे मूर्तिकार गणेशमूर्तींची रंगरंगोटी करण्यात मग्न आहेत. गणेशमूर्ती बनवल्यावर प्रथम पांढरा रंग मारला जातो तो काही दिवसांनी सुकल्‍यावर कच्चा रंग देतात. नंतर त्यावर पक्का रंग देऊन शेवटचा हात फिरवताना रंगीबेरंगी आभूषणे व नाजूक कलाकुसर केली जाते. श्री कृपा आर्टमध्ये मूर्तींवर अखेरचा हात फिरवण्याची लगबग सुरू आहे.
---------------
कोट
भाविकांनी आवडीने गणेशमूर्ती त्यांनी सांगितलेल्या उंचीप्रमाणे तयार करण्याचे काम सुरू आहे. यंदा सव्वाशे ते दीडशे मुर्तींचे रंगकाम काम आवरण्यासाठी संपूर्ण मेस्त्री कुटुंबातील सदस्य कामात व्यस्त आहोत.
- योगेश मेस्त्री, श्री साई आर्ट गणेशमूर्तीशाळा

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91602 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..