शिवसेनेला एकजीव करण्यासाठी भास्कर जाधवही मैदानात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवसेनेला एकजीव करण्यासाठी भास्कर जाधवही मैदानात
शिवसेनेला एकजीव करण्यासाठी भास्कर जाधवही मैदानात

शिवसेनेला एकजीव करण्यासाठी भास्कर जाधवही मैदानात

sakal_logo
By

शिवसेनेला संजीवनी देण्यासाठीच मैदानात
भास्कर जाधवः गणेशोत्सवानंतर महाराष्ट्र दौरा; शिंदे गट, भाजपविरोधी थोपटले दंड
चिपळूण, ता. ३०ः शिवसेनेच्या नेतेपदी आमदार भास्कर जाधव यांची निवड झाल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजपविरोधात दंड थोपटले आहेत. शिवसेना एकजीव करण्यासाठी ते गणेशोत्सवानंतर राज्याचा दौरा करणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारल्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेला भलेमोठे खिंडार पडले आहे. शिवसेनेच्या 55 आमदारांपैकी 39 आमदार एकनाथ शिंदे यांनी फोडले. विशेष म्हणजे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेसाठी दिवसरात्र एक करणाऱ्या आमदारांची संख्या बंडखोरांमध्ये सर्वाधिक आहे. त्यामुळे शिवसेनेसाठी बंडाची ही जखम प्रचंड भळभळती आहे. ठाकरे गटातील शिवसेनेत गळती सुरू असताना युवानेता आदित्य ठाकरे राज्याचा दौरा करत आहेत. पावसाळ्यानंतर उद्धव ठाकरे दौरा करणार आहेत; मात्र गणेशोत्सवानंतर भास्कर जाधव यांनी राज्याचा दौरा करण्याची तयारी सुरू केली आहे.
बंडखोरीनंतर ते विधानसभा, मुंबईसह कोकणात होणाऱ्या पक्षाच्या बैठकांमध्ये सहभाग घेत शिवसैनिकांना बळ देण्याचे काम करत होते. त्याची दखल घेऊन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची पक्षाच्या नेतेपदी निवड केली. त्यामुळे गणेशोत्सवानंतर ते महाराष्ट्राचा दौरा करून ठिकठिकाणी कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या बैठका आणि मेळावे घेणार आहेत. एकनाथ शिंदे तसेच बंडखोर आमदारांनी शिवसेनेच्याच नावाचा वापर करायला सुरवात केली आहे. अशा परिस्थितीत पक्षाने भास्कर जाधव यांची नेतेपदी निवड करत त्यांना ताकद देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे शिवसैनिकांमधील संभ्रम दूर करण्यसाठी तसेच पक्षाला बळकटी देण्यासाठी त्यांनी राज्याचा दौरा करण्याचे नियोजन केल्याचे त्यानी सांगितले.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच पक्षासाठी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. ते लवकरच महाराष्ट्र दौरा करणार आहेत. पक्षाला लागलेली गळती थांबवण्यासाठी ठाकरे स्वत: मैदानात उतरणार आहेत. गणेशोत्सवानंतर भास्कर जाधव यांनीही महाराष्ट्राच्या दौऱ्याचे नियोजन केले आहे.

चौकट
शिवसेना आक्रमक करण्याचे ध्येय
शिवसेना पक्षाला नवसंजीवनी देण्याचे आणि आणखी आक्रमक करण्याचे ध्येय निश्चित केले आहे. गणेशोत्सवानंतर मी पक्षप्रमुखांना भेटणार आहे. त्यांच्याशी चर्चा करून दौरा सुरू करणार आहे. प्रादेशिक पक्ष संपवण्याचा भाजपचा प्रयत्न शिवरायांचा महाराष्ट्र खपून घेणार आहे. बारसूमध्ये नाणार प्रकल्प व्हावा यासाठी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी पत्र दिले आहे. आता केंद्रात आणि राज्यातही सरकार भाजपचे आहे. त्यामुळे भाजपने हा प्रकल्प सुरू करावा असे भास्कर जाधव यानी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91615 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..