राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात
राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात

राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात

sakal_logo
By

46440
सिंधुदुर्गनगरी ः राष्ट्रीय खेळाडू केशर निगुर्णला सन्मानित करताना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी.

राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात
सिंधुदुर्गनगरी, ता. २९ ः जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्यावतीने राष्ट्रीय क्रीडा दिन व मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सावंतवाडी येथील राष्ट्रीय खेळाडू केशर निगुर्णला जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये उपक्रम राबविण्यात आले. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व वराडकर हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय, कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने गेल्या ५ वर्षातील राष्ट्रीय खेळाडूंचा सन्मानिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. लंगडी या पारंपारिक खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. मेजर ध्यानचंद यांच्या जीवनावर प्रश्नमंजुषा घेऊन त्यांच्या जीवनावरील व हॉकी खेळात केलेल्या कामगिरीचा लघुपट दाखवण्यात आले. या कार्यक्रमास सुमारे ६५० विद्यार्थांची उपस्थिती होती. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व माध्यमिक विद्यामंदिर कनेडी यांच्यामार्फत शालेय स्तरावर कॅरम स्पर्धेचे आयोजन केले होते. विजेत्या खेळाडूंना प्रशस्तिपत्रक देण्यात आले. न. शा. पंतवालावलकर महाविद्यालय, देवगड येथे रस्सीखेच स्पर्धा घेऊन राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस यांनी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91618 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..