रत्नागिरी-रत्नागिरीसह आठ जिल्ह्यात मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्क | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-रत्नागिरीसह आठ जिल्ह्यात मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्क
रत्नागिरी-रत्नागिरीसह आठ जिल्ह्यात मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्क

रत्नागिरी-रत्नागिरीसह आठ जिल्ह्यात मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्क

sakal_logo
By

-rat२९p५१.jpg
L46446
- मुंबई ः केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत.
------
rat२९p५२.jpg
46447
- बैठकीत दूरदृश्य प्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी.
-------------
रत्नागिरीसह आठ जिल्ह्यात मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्क

दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत मंत्री सामंतांनी साधला गडकरींशी संवाद
रत्नागिरी, ता. २९ : रत्नागिरीसह जालना, भिवंडी, अकोला, सांगली, जळगाव, सोलापूर, नाशिक या ठिकाणी मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्क लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. या माध्यमातून उद्योग व्यवसायास चालना मिळणार आहे. वाहतूक खर्च कमी झाल्यामुळे पर्यायाने वस्तूंच्या किंमती कमी होण्यास मदत होणार आहे. याचा फायदा उद्योजकांना आणि ग्राहकांना होणार आहे, असे मत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले.
कोकणच्या विकासासाठी आणि बंदरांस जोडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निवळी-जयगड या चौपदरी रस्त्याची मागणी त्यांनी केंद्रीय वाहतून मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत दूरदृश्य प्रणालीद्वारे महत्वाच्या बैठकीत ते बोलत होते.
श्री. सामंत म्हणाले, राज्यामध्ये संबंधित ठिकाणी मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्क झाल्यामुळे रत्नागिरी येथून आंबा, काजू, नाशिक, सांगली, जळगाव इत्यादी भागातून द्राक्ष, नागपूर येथून संत्री, अकोला येथून डाळ तसेच पश्चिम महाराष्ट्रातून साखर यांची निर्यात करणे अधिक सोयीचे होणार आहे. वाहतूक खर्चात कमी होणार असून या माध्यमातून निर्यात व्यवसायास गती मिळणार आहे. तसेच ज्या ठिकाणी पार्क होणार आहेत, त्या भागाच्या विकासामध्ये भर पडणार आहे. मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्क सुरू करण्यासाठी महाराष्ट्र राज्याचा उद्योग विभाग, राष्ट्रीय महामार्ग लॉजीस्टिक मनेजमेंट आणि रेल्वे विकास निगम या विभागाच्या सामजस्य करारानुसार हे पार्क तयार होणार आहेत. या पार्कसाठी आवश्यक जागा राज्यशासन उपलब्ध करून देणार आहे. याचे प्रस्ताव उद्योग विभागाकडून पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागाकडे पाठवले जाणार आहेत.
कोकणाच्या विकासासाठी आणि बंदरांस जोडण्यासाठी आवश्यक असणाऱ्या निवळी-जयगड या चौपदरी रस्त्याची मागणी आज केंद्रीय वाहतून मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे उद्योगमंत्री सामंत यांनी केली. निवळी-जयगड रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम लवकरच सुरू होईल. हा रस्ता चौपदरी झाल्यामुळे या भागातील वाहतूक सुलभ होण्यास मदत होणार आहे. बंदराला रस्ते वाहतुकीने जोडण्यासाठी हा रस्ता महत्वपूर्ण असल्याचे सामंत यांनी सांगितले. यावर श्री. गडकरी यांनी याचा प्रस्ताव तत्काळ पाठविण्यास सांगितले.
-----------
चौकट-
रोजागार निर्मितीला चालना
मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्कच्या माध्यमातून राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल आणि वाहतूक खर्चामध्ये बचत होईल. महाराष्ट्र राज्य हे प्रगतशील राज्य असून हे पार्क झाल्यानंतर राज्याची प्रगती अधिक गतिमान होण्यास मदत होणार आहे, असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91625 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..