दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार
दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार

दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार

sakal_logo
By

46449
सावंतवाडी ः येथे पत्रकार परिषदेत बोलताना विनायक राऊत. बाजूला जिल्हाप्रमुख संजय पडते, बाळा गावडे आदी. (छायाचित्र ः रुपेश हिराप)


दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार

खासदार विनायक राऊत ः परवानगी न दिल्यास उच्च न्यायालयात जाऊ

सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. २९ ः शिवसेनेचा दसरा मेळावा हा कुठल्याही परिस्थितीत शिवतीर्थावरच उद्धव ठाकरे यांची शिवसेनाच घेईल; मात्र शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेने परवानगी देताना राजकीय दबावापोटी नौटंकी किंवा नाटक केल्यास उच्च न्यायालयातही जाऊ, असे स्पष्टीकरण शिवसेना सचिव तथा खासदार विनायक राऊत यांनी आज येथे दिले.
श्री. राऊत यांनी आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतली. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, महिला तालुकाप्रमुख अपर्णा कोठावळे, बाळा गावडे, मायकल डिसोजा, शिवदत्त घोगळे, गुणाजी गावडे, योगेश नाईक आदी उपस्थित होते.
ते म्हणाले, ‘‘नीच आणि कपटी द्वेषबुद्धीने त्यांनी पाऊल टाकले आहे. केवळ बारा खासदार आणि ४० आमदार फोडून शिंदे गट गप्प बसला नाही तर शिवसेनेच्या प्रत्येक गोष्टीवर दावा टाकायचा आणि शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या नावासह धनुष्यबाणावर हक्क सांगायची नीच वृत्ती शिंदे गटाकडून सुरू आहे. आता शिवतीर्थावर होणाऱ्या दसरा मेळाव्यावरही त्यांनी दावा केला आहे. यापूर्वी अशी वृत्ती कधीच दिसली नव्हती. ती शिंदे गटाच्या गद्दारांच्या माध्यमातून भाजप करत आहे; मात्र काही झाले तरी शिवतीर्थावर दसरा मेळावा हा उद्धव ठाकरे यांची शिवसेना घेईल. त्यासाठी उच्च न्यायालयातही जाऊ.’’
लोकशाहीचा गळा घोटू नका
दुसरीकडे जो काही शिंदे गट आणि शिवसेनेच्या बाबतीत न्यायालयात वाद आहे, तो पाहता देशाच्या दृष्टीने व देशाची लोकशाही वाचवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या पूर्ण खंडपीठाने निर्णय घेऊन घटनात्मक अर्थ लावावा, कारण भविष्यात लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम त्यांच्या हातून होऊ नये, असे राऊत म्हणाले.
--
गोगावलेंविरोधात न्यायालयात जावू
श्री राऊत पुढे म्हणाले, ‘‘सत्तेचा माज काय असतो? हे आमदार भरत गोगावलेंनी दाखवून दिले. एकीकडे लोकप्रतिनिधींच्याबाबतचे दावे सहा महिन्यांच्या आत निकाली काढा, असे उच्च न्यायालय सांगत असताना आमदार गोगावले हे शिंदे गट आणि शिवसेनेतील वादावर सहा वर्षे निकाल लागणार नाही, असे सांगत आहेत. एकूणच हे वक्तव्य म्हणजे न्यायालयाच्या निर्णयाचा अवमानच आहे. लवकरच या वक्तव्याविरोधात न्यायालयात याचिका दाखल करू.
--
संजय राऊत यांच्या पाठिशी
खासदार संजय राऊत यांना ईडीने फसवून तुरुंगात टाकले आहे. ईडीचे कोड असल्याने तेथे जामीन मिळण्यासाठी विलंब लागत आहे; परंतु श्री. राऊत यांच्या पाठीमागे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस भक्कमपणे उभी आहे, असेही राऊत म्हणाले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91628 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..