सातार्डा येथील महिलेवर किरकोळ वादातून हल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सातार्डा येथील महिलेवर 
किरकोळ वादातून हल्ला
सातार्डा येथील महिलेवर किरकोळ वादातून हल्ला

सातार्डा येथील महिलेवर किरकोळ वादातून हल्ला

sakal_logo
By

सातार्डा येथील महिलेवर
किरकोळ वादातून हल्ला
सावंतवाडी, ता. २९ ः किरकोळ कारणावरून महिलेच्या डोक्यावर चिरे तासणीचा मोद मारून गंभीर जखमी केल्याची घटना आज साटेली सातार्डा येथे घडली. ललिता लवू नाईक, असे जखमी महिलेचे नाव असून, तिच्यावर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून अधिक उपचारासाठी गोमेकॉत पाठविले. महिलेचा पती लवू नाईक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातार्डा येथील ज्ञानेश्वर गंगाराम सावंत (वय ४८) याच्यावर गुन्हा दाखल झाला.
सातार्डा साटेली येथील फिर्यादी आणि संशयितांची घरे लागूनच आहेत. दोघे एकमेकांचे शेजारी असून आज सायंकाळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. यावेळी ज्ञानेश्वर सावंत याने चिरे तासणीचा मोद घेऊन ललिता नाईक यांच्या डोक्यावर मारला. यावेळी तिचे पती लवू नाईक सोडवायला गेले असता त्यांच्या पायावर दांडा मारून त्यांनाही जखमी केले. यात महिला गंभीर जखमी झाली. तिला तातडीने सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर गोमेकॉत हलविल्याचे पोलिसांनी सांगितले. सावंतवाडी पोलिस ठाण्यात संशयितावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91635 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..