कणकवली शहरात वाहतूक कोंडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कणकवली शहरात वाहतूक कोंडी
कणकवली शहरात वाहतूक कोंडी

कणकवली शहरात वाहतूक कोंडी

sakal_logo
By

46481
कणकवली : शहरात चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी आज पटवर्धन चौकात उपस्थित असलेले नगराध्यक्ष समीर नलावडे आदी.


कणकवली शहरात वाहतूक कोंडी

खरेदीसाठी गर्दी; नगरपालिका प्रशासनाकडून दखल

कणकवली, ता. ३० : गणेशोत्‍सवाच्या अनुषंगाने विविध वस्तूंच्या खरेदीसाठी कणकवली शहर बाजारपेठेत प्रचंड गर्दी उसळली. त्‍यामुळे बाजारपेठेसह महामार्ग आणि शहरातील अंतर्गत रस्त्यांवरही मोठी वाहतूक कोंडी सातत्‍याने होत होती. दरम्‍यान, वाहतूक कोंडीमुळे चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक अभिजित मुसळे, बंडू गांगण आदींनी सकाळी आठपासूनच पटवर्धन चौकात देखरेख ठेवली होती.
दरम्‍यान, शहरातील पटवर्धन चौक, तेलीआळी डीपी रोड, भालचंद्र आश्रम रोड, झेंडा चौक या ठिकाणी सातत्‍याने वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी सोडविण्यासाठी पोलिस यंत्रणेला अविश्रांत मेहनत घ्यावी लागत आहे. शहरातील जानवली पूल ते स्टेट बँक या दरम्‍यानचा सेवा रस्ता अरुंद आहे. या रस्त्यावर वाहन पार्किंग आणि विरुद्ध बाजूंनी येणाऱ्या वाहनांमुळेही रांगा लागत आहेत. शहरातील एस. एम. हायस्कूल आणि गांगो मंदिर येथील अंडरपासमध्ये वाहन पार्किंग झाल्‍यास कारवाईचा इशारा पोलिस प्रशासनाने दिला होता; मात्र त्‍याची पर्वा न करता सकाळपासूनच अनेक वाहने या अंडरपासमध्ये उभी केल्‍याचे चित्र होते. शहर बाजारपेठेसह सध्या बस स्थानकातही प्रवाशांची प्रचंड गर्दी आहे. यात बसेस उशिरा सुटत असल्‍याने प्रवाशांचा खोळंबा होत आहे. पटवर्धन चौकात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी हवालदार प्रकाश गवस, हवालदार चंद्रकांत माने, पोलिस नाईक विनोद चव्हाण कर्तव्य बजावत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91712 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..