शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री शिंदेंना साकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे
मुख्यमंत्री शिंदेंना साकडे
शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री शिंदेंना साकडे

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री शिंदेंना साकडे

sakal_logo
By

46494
मुंबई ः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देताना महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाचे जनरल सेक्रेटरी शिवाजी खांडेकर.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे
मुख्यमंत्री शिंदेंना साकडे

तळेरे, ता. ३० ः राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक ज्वलंत प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत. हे प्रश्न मार्गी लागण्यासाठी महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर महामंडळाचे राज्य सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर शिक्षकेतरांच्या अडचणींचा पाढा वाचला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मागण्यांचे निवेदन दिले.
मुंबई येथे विधान भवनामध्ये मुख्यमंत्र्यांची खांडेकरांनी भेट घेतली. यावेळी राज्यातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत सविस्तर चर्चा केली. विविध प्रश्न प्रलंबित असल्याने त्यांच्या हक्कावर गदा येत आहे. शिक्षकांप्रमाणेच शिक्षकेतर कर्मचारी प्रामाणिकपणे सेवा बजावत आहेत. त्यामुळे त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी केली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनाही निवेदन दिले. यावेळी माजी जलसंपदा मंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, पुणे विभागाचे शिक्षक आमदार जयंत आसगावकर, औरंगाबाद विभागाचे शिक्षक आमदार विक्रम काळे, नाशिक विभागाचे पदवीधर आमदार सुधीर तांबे, महामंडळाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विनोद गोरे आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91729 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..