नडगिवेत क्रीडादिन उत्साहात साजरा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नडगिवेत क्रीडादिन उत्साहात साजरा
नडगिवेत क्रीडादिन उत्साहात साजरा

नडगिवेत क्रीडादिन उत्साहात साजरा

sakal_logo
By

swt306.jpg
46495
नडगिवेः हॉकीपटू ध्यानचंद यांना अभिवादन करताना मुख्याध्यापक सरदार निकम. सोबत अध्यापक तानाजी पाटील, राधेश्याम पांडेय, कौस्तुभ देसाई, सुयोग राजापकर आदी.

नडगिवेत क्रीडादिन उत्साहात साजरा
ध्यानचंदांना अभिवादन ः नॅशनल इंग्लिश मीडियमचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
तळेरे, ता. ३०ः कणकवली तालुक्यातील आदर्श एज्युकेशन सोसायटी खारेपाटण संचालित नडगिवे येथील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूल येथे राष्ट्रीय क्रीडादिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक सरदार निकम यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आले. त्यानंतर हॉकीपटू ध्यानचंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या कार्यक्रमात आपल्या वक्तव्यात विद्यालयाचे मुख्याध्यापक निकम यांनी विद्यार्थ्यांना हॉकी खेळातील मातब्बर खेळाडू ध्यानचंद यांचे तसेच इतर काही क्रीडावीरांची उदाहरणे दिली. आपल्या ध्येयावर एकनिष्ठ राहून जीवनात आपला व्यवसाय व आपले कार्य सुनिश्चित करा. यशापयशाचा विचार न करता सतत कार्यरत राहून साधनेतून ध्येयपूर्ती करा आणि कर्तृत्ववान बना, असे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. यावेळी शिक्षणातील खेळाचे महत्त्व त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून सांगितले.
याप्रसंगी झालेल्या वक्तव्यात आयेशा पटेल या विद्यार्थिनीने हॉकीवीर ध्यानचंद यांच्या जीवन चरित्राबाबत माहिती दिली. तसेच आपल्या जीवनात खेळाचे महत्त्व अनन्यसाधारण असल्याचे प्रतिपादन केले. पहाद सारंग याने मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी खेळाचे महत्त्व अत्यावश्यक असल्याचे सांगितले. भारतात खेळात नावलौकिक करणाऱ्या क्रीडापटूंचा उल्लेख करून त्यांनी स्वकर्तृत्वाने भारताचे नाव उज्ज्वल केले, तसेच आपणही करूया, असे आवाहन केले. अध्यापक राधेश्याम पांडेय यांनी ध्यानचंदांसारख्या आदर्श व्यक्तींचे चरित्र समजून घेऊन त्यानुसार जीवनात आचरण केल्यास भविष्यात नक्कीच यशस्वी व्हाल, असे मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीनुसार खेळ अथवा क्षेत्र निवडून त्यात अग्रेसर व्हावे, असे आवाहन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91730 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..