रत्नागिरी ः प्रवाशांची लूट थांबवण्यासाठी खासगी वाहनांची तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी ः प्रवाशांची लूट थांबवण्यासाठी खासगी वाहनांची तपासणी
रत्नागिरी ः प्रवाशांची लूट थांबवण्यासाठी खासगी वाहनांची तपासणी

रत्नागिरी ः प्रवाशांची लूट थांबवण्यासाठी खासगी वाहनांची तपासणी

sakal_logo
By

rat३०p३.jpg
46499
रत्नागिरीः जिल्ह्यामध्ये येणाऱ्या गणेश भाविकांसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे उमेश हॉटेल, साखरपा येथे शुभेच्छा फलक लावला असून तेथे भाविकांना मोफत चहापाण्याची व्यवस्थाही कार्यालयातर्फे केलेली आहे.
------------------
खासगी वाहनांची तपासणी; नियमांची अंमलबजावणी

प्रवाशांच्या लूटीविरोधात आरटीओची करडी नजर; भाडेदर निश्चित
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ३० ः गणेशोत्सवकाळात खासगी बस वाहतूकदारांकडून कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची अव्वाच्यासव्वा भाडे आकारून लूट होत असल्याच्या तक्रारी आहेत. ही लूट थांबवण्यासाठी खासगी ट्रॅव्हल्सधारकांवर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची करडी नजर आहे. ठिकठिकाणी वाहन तपासणी केली जात आहे. येणाऱ्या चाकरमान्यांचे आरटीओंकडून स्वागतही होत आहे; मात्र प्रवाशांची लूट थांबवण्यासाठी जागरूक नागरिकांनी दीडपट तिकिटदर आकारल्यास तत्काळ आरटीओंकडे ०२३५२-२२५४४४ या नंबरवर तक्रार करावी, असे आवाहन सहाय्यक आरटीओ अजित ताम्हणकर यांनी केले आहे.
कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची खासगी ट्रॅव्हल्सधारकांकडून लूट होत असल्याच्या तक्रारी वारंवार येतात. दीड ते दोनपट भाडे आकारले जाते. कोकणात येणाऱ्या भक्तगणांना एसटी, रेल्वेचे आरक्षण फुल्ल असल्याने खासगी ट्रॅव्हल्सचा पर्याय निवडावा लागतो. त्यांची अडचण लक्षात घेऊन ट्रॅव्हल्सधारक अव्वाच्यासव्वा तिकीट आकारून त्यांची लूट करत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्याची दखल घेऊन गणेशोत्सवकाळात कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची प्रवास तिकिटात कोणतीही लूट होऊ नये, यासाठी आरटीओ कार्यालयाने खासगी प्रवासी वाहतुकीचे भाडेदर निश्चित केले आहे.
वाहतूक कोंडीसह कोकणात येणाऱ्या प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी सहा पथके महामार्गावर तैनात केली आहेत. ठिकठिकाणी भक्तगणांचे आरटीओ कार्यालयामार्फत स्वागतही करण्यात येत असून चहापान दिला जात आहे, असेही ताम्हणकर म्हणाले.
-----------------
चौकट-
अंमलबजावणीचीही खातरजमा
तिकिटदराचे स्टीकर खासगी बसेस बुकिंग सेंटर आणि या बसेसच्या मागे लावण्याच्या सूचना आरटीओ कार्यालयाकडू दिल्या आहेत. जेणेकरून प्रवाशांना काही तक्रार असल्यास या स्टीकर्सवर अधिक माहिती असल्याने मदत होणार आहे. जिल्ह्यातील सर्व खासगी वाहतूकदारांना या संदर्भात सूचना करून अंमलबजावणी करण्यासाठी सांगितले. याची अंमलबजावणी होतेय की नाही याची शहानिशा आरटीओ अधिकारी, कर्मचारी करणार आहेत.
..
चौकट
५० टक्के अधिक भाडे देता येणार
गणेशोत्सवासाठी चाकरमानी लाखोंच्या संख्येने जिल्ह्यात दाखल होणार असल्याने खासगी बस वाहनधारकांकडून जादा तिकीट आकारणी होते; परंतु एसटी बसेसच्या ५० टक्के अधिक भाडेदर देता येणार आहे; मात्र दीडपट घेतल्यास तशी तक्रार प्रवाशांनी करावी. संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्यात येईल, असे ताम्हणकर यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91764 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..