संगमेश्वर ः ग्रामस्थांची सुरक्षा वाऱ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संगमेश्वर ः ग्रामस्थांची सुरक्षा वाऱ्यावर
संगमेश्वर ः ग्रामस्थांची सुरक्षा वाऱ्यावर

संगमेश्वर ः ग्रामस्थांची सुरक्षा वाऱ्यावर

sakal_logo
By

राष्ट्रीय महामार्गाचे निकृष्ट कामः लोगो
.........
कडवई दशक्रोशीवासीयांची सुरक्षा वाऱ्यावर

मनसेचे आंदोलन आश्वासनाअंती स्थगित; कार्यवाहीचा शब्द
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. ३० ः संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे महामार्गाचे काम करत असताना कडवई दशक्रोशीतील तसेच धामापूर पंचक्रोशीतील अनेक गावांमधील ग्रामस्थ व वाहनचालक यांच्या सुरक्षेचा विचार केला नसून या ठिकाणी उड्डाणपूल व्हावा, या मागणीवर मनसेच्यावतीने यापूर्वीपासून आवाज उठवला जात आहे. या प्रमुख मागणीसह महामार्गाच्या निकृष्ट कामाची चौकशी व्हावी तसेच खड्डे पडून नादुरुस्त झालेल्या महामार्गाची गणपतीपूर्वी दुरुस्ती व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी मनसेच्यावतीने जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तुरळ येथे महामार्गावर ठिय्या आंदोलन पुकारण्यात आले.
संगमेश्वर तालुक्यातील तुरळ येथे महामार्गावर उड्डाणपूल व्हावे, चिपळूण ते तळेकांटेपर्यंतचा महामार्ग सुस्थितीत व्हावा तसेच मुंबई-गोवा महामार्गाच्या नवीन निकृष्ट कामाची चौकशी व्हावी या प्रमुख मागण्यांसाठी मनसेच्यावतीने ठिय्या आंदोलन छेडले होते. मात्र, राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या सकारात्मक पत्रानंतर हे आंदोलन स्थगित करत असल्याचे चव्हाण यांनी सांगितले. या आंदोलनाला रिक्षा संघटनेने सक्रिय पाठिंबा दर्शवला होता. महामार्ग विभागाचे अभियंता रहाटे यांनी या मागण्यांबाबत सकारात्मक पत्र दिल्यानंतर हे आंदोलन राष्ट्रगीतानंतर स्थगित करण्यात आले.
या पत्रात महामार्गाचे खड्डे भरण्याचे काम सुरू करण्यात आले असून, ते गणपतीपूर्वी पूर्ण केले जाईल तसेच महामार्गाच्या नवीन कामाला गेलेले तडे पूर्ववत करण्याच्या सूचना ठेकेदारास देण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
यावेळी मनसेचे संगमेश्वर तालुकाध्यक्ष अनुराग कोचिरकर, उपतालुकाध्यक्ष नंदकुमार फडकले, महेश गुरव, उदय घाग (चिपळूण), विभागध्यक्ष अजिंक्य चव्हाण, सुरेश घाग, जितेंद्र महाडिक, संजय रसाळ, परेश धामनाक, तुरळ तंटामुक्ती अध्यक्ष रमेश डिके, देवरूख शहराध्यक्ष सागर संसारे, सहाय्यक पोलिस निरीक्षक देशमुख, शेखर नलावडे, रिक्षा संघटना उपाध्यक्ष संदीप चिले, सल्लागार मोहन ओकटे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, मनसेचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
----------------------------------
चौकट
साईट व्हिजिट करून अहवाल
तुरळ येथील उड्डाणपूल व सुरक्षा यासाठी स्वतंत्र अभियंता याबाबतच्या सर्व शक्यतांची पडताळणी करून साईट व्हिजिट करून अहवाल सादर करण्याचा सूचना देण्यात आल्या असून याबाबत लवकरच सकारात्मक विचार होईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. त्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
-------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91766 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..