चिपळूण ः अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांना संघटनेचे निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांना संघटनेचे निवेदन
चिपळूण ः अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांना संघटनेचे निवेदन

चिपळूण ः अन्न नागरी पुरवठा मंत्र्यांना संघटनेचे निवेदन

sakal_logo
By

- ratchl३०१.jpg
४६५०६
चिपळूण ः मंत्री रवींद्र चव्हाण यांना निवेदन देताना अशोक कदम व सहकारी.
.......
रेशन दुकानदारांना कमिशन देताना दिरंगाई

संघटनेचा आरोप; समस्यांबाबत मंत्री चव्हाण यांना निवेदन
चिपळूण, ता. ३० ः पीएम मोफत धान्याचे कमिशन मार्जिनची रक्कम जिल्हा पुरवठा विभागाकडे शासनाकडून वेळेत वर्ग होते. ही रक्कम जिल्हा पुरवठा विभागाकडून तालुका पुरवठा विभागाकडे पाठवण्यास हेतूपुरस्सर दिरंगाई होते. तालुका पुरवठा विभागाकडे ही रक्कम वर्ग झाल्यानंतर तालुका पुरवठा विभागसुद्धा ती रक्कम दुकानदार यांच्या खाती वर्ग करण्यात हेतूपुरस्सर दिरंगाई करत आहेत, असा आरोप करत कमिशनची रक्कम दरमहा एजन्सी धारकाला मिळण्याची कार्यवाही व्हावी, अशी मागणी रेशन दुकानदारांनी केली. आपल्या समस्यांचे निवेदन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांना दिले.
रेशनिंग व केरोसीन चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष अशोक कदम यांच्या नेतृत्त्वाखाली मंत्र्याना हे निवेदन देण्यात आले. त्यात म्हटले आहे की, जिल्ह्यातील रास्तदर धान्य दुकानदार चालक-मालक हे शासनाकडून वेळोवेळी येणाऱ्या प्रत्येक धोरणांची काटेकोरपणे अंमलबजावणी करून शासनास सहकार्य करतात. प्रत्येक तालुक्यातून तात्पुरते व्यवस्थापन असलेली दुकाने लगतच्या दुकानाला दीर्घकाळ जोडलेली आहेत. काही दुकाने स्वतंत्रपणे तात्पुरते व्यवस्थापनावर देण्यात आली आहेत. अशा सर्व दुकानांच्या कायमस्वरूपीचा परवाना देण्याबाबतीत कार्यवाही करा. रत्नागिरी जिल्हा डोंगराळ व दुर्गम असलेल्या ऑनलाइनसाठी नेट सुविधा सर्व ठिकाणी व्यवस्थित मिळत नाही. परिणामी ऑनलाइन वितरण व ऑफलाइन दुकान, रुट नॉमिनीद्वारे ऑनलाइन वितरण सध्या सुरू आहे. या कामी असणाऱ्या पॉस मशिनची नेट कॅपॅसिटी कमी असल्याने शिवाय मशीनला ६ वर्षांपेक्षा जास्त कालावधी झालेला आहे. तरी सर्वच मशीन तत्काळ ५जी प्रणालीच्या नवीन मशीन मिळाव्यात. तालुका गोडावूनकडे धान्य डिस्पॅच झाल्यानंतर धान्याचे टीपी त्याच दिवशी तालुका गोदामपालक याच्या सॉफ्टवेअरला अपलोड करणे आवश्यक आहे. निवेदन देताना रमेश राणे, ओंकार पाटणकर, प्रकाश आग्रे आदी उपस्थित होते.
रेशनकार्डवरील नावे ऑनलाइन कमी करणे, वाढवणे व फेरबदल करणे अशा अनेक समस्या येत असल्याने बंद केलेली रेशनकार्ड वेळेत ऑनलाइनवरून कमी होत नाहीत. शिवाय नव्याने दाखल केलेली नावे वेळेत ऑनलाइन होऊन दिसत नाहीत. परिणामी, लाभार्थी आणि रेशन दुकानदार यांचे वारंवार वादविवाद होत असतात. त्यामुळे या कामाकरिता जिल्हास्तरावरून दोन प्रतिनिधी कायमस्वरूपी द्यावेत, अशी मागणी निवेदनात केली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91767 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..