टु १ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टु १
टु १

टु १

sakal_logo
By

सानिका पवार हिचे यश
रत्नागिरी : फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीच्या तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागातील सानिका पवार हिला (कै.) मृणाल हेगशेट्ये राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले. नवनिर्माण महाविद्यालयात ही स्पर्धा झाली. या स्पर्धेत विविध महाविद्यालयातील २२ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या दोन फेऱ्यांमध्ये यश मिळवून हे पारितोषिक मिळवले आहे, त्यातील एक फेरी ही आयत्यावेळी विषय देऊन वक्तृत्व सादर करणे ही होती. या यशाबद्दल फिनोलेक्स अॅकॅडमीच्या अध्यक्षा श्रीमती अरुणा कटारा, मॅनेजिंग ट्रस्टी अमृता कटारा, प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद, सर्व प्राध्यापक व कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन केले.
..
-rat२९p३९.jpg
46580
- हेमंत चव्हाण
-----------
प्रा. हेमंत चव्हाण यांची निवड
रत्नागिरी : फिनोलेक्स अॅकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नोलॉजीचे मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागातील प्रा. हेमंत चव्हाण यांची २०२२-२३ या वर्षासाठी अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स राज्य व्यावसायिक विभागाच्या पहिल्या सेक्शन लीडरशिप टीमच्या मेंबर अॅट लार्ज पदासाठी निवड झाली. अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स व्यावसायिक विभागातील स्वयंसेवक संधी सदस्यांना अर्थपूर्ण मार्गाने सहभागी होण्यास आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग क्षेत्रात त्यांची दृश्यमानता वाढविण्यास मदत करते. कार्यक्रमांचे नियोजन करण्यापासून ते वित्त व्यवस्थापित करण्यापर्यंत मदत करते.या यशाबद्दल फिनोलेक्स अॅकॅडमीच्या अध्यक्षा श्रीमती अरुणा कटारा, अमृता कटारा, डॉ. कौशल प्रसाद, डॉ. एम. एस. किरकिरे आदींनी अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91799 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..