भवानी सहकारी पतसंस्थेची सभा बांद्यात खेळीमेळीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भवानी सहकारी पतसंस्थेची सभा बांद्यात खेळीमेळीत
भवानी सहकारी पतसंस्थेची सभा बांद्यात खेळीमेळीत

भवानी सहकारी पतसंस्थेची सभा बांद्यात खेळीमेळीत

sakal_logo
By

swt3012.jpg
46551
बांदाः भवानी पतसंस्थेच्या बैठकीत मान्यवरांचे स्वागत करताना व्यवस्थापक भिकाजी गवस व इतर.

भवानी सहकारी पतसंस्थेची
सभा बांद्यात खेळीमेळीत
बांदा, ता. ३०ः येथील श्री भवानी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. यावेळी संस्थेला झालेल्या नफ्यातून सभासदांसाठी यावर्षी सुद्धा १४ टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. वार्षिक सभा संस्थेचे अध्यक्ष वालेतीन आल्मेडा यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेच्या सभागृहात झाली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष प्रवीण शिरसाट, संचालक राजेंद्र वाळके, अशोक सावंत, अशोक देसाई, रेश्मा आईर, सालू परेरा, संजय नाईक, व्यवस्थापक भिकाजी गवस आदी उपस्थित होते. संस्थेला सलग सातव्या वर्षी ''अ'' वर्ग मिळाल्याने अभिनंदन करण्यात आले. कोविड कालावधीत संस्थेला नफ्यात आणण्यासाठी व ''अ'' वर्ग कायम राखल्याबद्दल संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग यांचे अभिनंदन करण्यात आले. सूत्रसंचालन राकेश केसरकर यांनी केले. आभार वालेतीन आल्मेडा यांनी मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91809 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..