फुलांची आवक वाढल्याने दर गगनाला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फुलांची आवक वाढल्याने दर गगनाला
फुलांची आवक वाढल्याने दर गगनाला

फुलांची आवक वाढल्याने दर गगनाला

sakal_logo
By

46588
सावंतवाडी ः येथील फुल बाजारात खरेदीसाठी झालेली गर्दी.

फुलांची आवक वाढल्याने दर गगनाला

उत्सव बाप्पांचा; गणोशोत्सव सणासाठी मागणीतही मोठी वाढ

निखिल माळकर ः सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ३० ः गणेशोत्सव पार्श्वभूमीवर येथील फुल बाजारात विविध प्रकारच्या फुलांची आवक वाढली आहे. फुल खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होत आहे. फुलांचे भाव मात्र कडाडले आहेत.
गणेशोत्सव काळात विविध व्रतवैकल्ये केली जात असल्याने फुलांना अधिक मागणी असते. परिणामी, फुलांच्या भावात मोठी वाढ झाली आहे. दोन दिवसाच्या तुलनेत मोगऱ्याचा भाव किलोमागे ३०० रुपयांनी वधारला आहे. अशातच विविध भागांत कोसळणाऱ्या पावसाचा देखील फटका फुलांना बसत आहे. यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात झेंडू, शेवंतीच्या फुलांची लागवड केली आहे. परिणामी, आठवडाभरापासून बाजारात फुलांची मागणी वाढली आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने बाजारात दर्जेदार फुले दाखल होत आहेत. या काळात फुलांना दरही चांगला मिळत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. दरवर्षी श्रावण आणि गणपती उत्सवासाठी फुल शेतकरी नियोजन करत असतो; मात्र यावर्षी पावसामुळे शेतकऱ्यांचे नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे फुलांचे उत्पादन कमालीचे घटले आहे. उत्पादन कमी मात्र मागणी वाढल्याने फुलांचे भाव कडाडले आहेत. पावसाने गुलाब आणि झेंडूवर आलेल्या बुरशीजन्य रोगामुळे उत्पादन घटले आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळीचा परिणाम जसा पिकांवर झालेला आहे, त्याचप्रमाणे तो फुलांवरही झालेला आहे. वातावरणातील बदलामुळे फुलांवर देखील करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे फुलांची तोडणी देखील मुश्किल झाली होती. अनेक बागा करप्याच्या प्रादुर्भावामुळे नष्ट झाल्या होत्या. त्यातच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लादण्यात आलेल्या नियमांत शिथिलता आल्याने गणेशोत्सव मोठ्या उत्साहात पार पडत आहे. त्यामुळे फुलांच्या मागणीत वाढ होत आहे. ग्राहक फुलांची खरेदी करत असल्याने शेतकऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
----------
फुलांचे दर असे
*फुले *दर
*मोगरा *९०० रू.प्रतिकिलो
*गुलाब*३००रू.प्रतिकिलो
*सफेद शेवंती *३५० रू.प्रतिकिलो
*झेंडू *१५० रू.प्रतिकिलो
*चाफा*७०० रू.(शेकडा)
*जास्वंद*४०० रू.(शेकडा)
*दुर्वा*२० ते २५ रू. एक जुडी
*गुलछडी*३०० रू.प्रतिकिलो
------------
चौकट
टाळ-मृदंगांचा स्वर घुमणार
गणेशोत्सवानिमित्त वातावरणात उत्साह संचारला आहे. यंदा टाळ मृदुगाला भक्तांकडून मोठी मागणी आहे. दोन वर्षे कोरोनामुळे गणेशोत्सव साधेपणाने साजरा झाला. यावर्षी नियमांचे बंधन नसल्याने घरोघरी टाळ-मृदुगांचा नाद घुमणार असून फुल व इतर साहित्याबरोबरच भजनी साहित्याची खरेदी होताना दिसत आहे. गावागावत भजनाचा जोरदार सराव ही सुरु आहे. आरती, भजन, कीर्तनासाठी टाळ, झांज, ढोलकीला पसंती दिली जात आहे.
--------------
कोट
पुणे, बेळगाव, कोल्हापूर या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात फुले येत असतात; मात्र, त्या ठिकाणी पावसामुळे आणि रोगामुळे फुलांचे दर वाढले आहेत. हे दर चतुर्थी काळात कायम राहण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- जमीर सारंग, फुल विक्रेते, सावंतवाडी

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91817 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..