काँग्रेस अल्पसंख्यांक तालुकाध्यक्षपदी शराफत वागळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

काँग्रेस अल्पसंख्यांक तालुकाध्यक्षपदी शराफत वागळे
काँग्रेस अल्पसंख्यांक तालुकाध्यक्षपदी शराफत वागळे

काँग्रेस अल्पसंख्यांक तालुकाध्यक्षपदी शराफत वागळे

sakal_logo
By

rat30p6.jpg
46502
रत्नागिरीः शराफत वागळे यांना नियुक्तीपत्र देताना हारिस शेकासन.

काँग्रेस अल्पसंख्यांक तालुकाध्यक्षपदी शराफत वागळे
रत्नागिरी, ता. ३१ ः सामाजिक अधिकार मिळवण्याची ताकद निर्माण करण्यासाठी समाजात जागरूकता येणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन काँग्रेसच्या अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन यांनी केले. जांभारी येथील सामाजिक युवा कार्यकर्ते शराफत वागळे यांची काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्या रत्नागिरी तालुकाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन यांनी जाहीर केले.
शहरातील काँग्रेस भवन येथे काँग्रेसच्या रत्नागिरी तालुका अल्पसंख्याक विभागाची बैठक उत्साहात पार पडली. या प्रसंगी जिल्हाध्यक्ष हारिस शेकासन, रमेश शाहा व शब्बीर भाटकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. या सभेला मुस्लिम युवकांची चांगली उपस्थिती होती. देशातील परिस्थिती बघता अल्पसंख्यांक समाजाला स्वतःचे अधिकार मिळवण्याकरिता काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून संघटित होणे आवश्यक आहे. रत्नागिरी तालुक्यातील अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरण्यास काँग्रेस पक्ष अजिबात मागे राहणार नाही, असे प्रतिपादन अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष शेकासन यांनी केले.
शराफत वागळे यांची रत्नागिरी तालुका काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल माजी खासदार व प्रदेश उपाध्यक्ष हुसैन दलवाई, माजी आमदार व प्रदेश सरचिटणीस हुस्नबानू खलिफे, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष अविनाश लाड व इतर नेते व पदाधिकाऱ्यांनी वागळे यांचे अभिनंदन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91830 Txt Ratnagiri Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..