संगमेश्वर ः कोकणातील शिवसेना नेत्याची मंत्री रवींद्र चव्हाणांसोबत बंद दाराआड चर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संगमेश्वर ः कोकणातील शिवसेना नेत्याची मंत्री रवींद्र चव्हाणांसोबत बंद दाराआड चर्चा
संगमेश्वर ः कोकणातील शिवसेना नेत्याची मंत्री रवींद्र चव्हाणांसोबत बंद दाराआड चर्चा

संगमेश्वर ः कोकणातील शिवसेना नेत्याची मंत्री रवींद्र चव्हाणांसोबत बंद दाराआड चर्चा

sakal_logo
By

मंत्री रवींद्र चव्हाणांच्या
दौऱ्याने ढवळले राजकारण
बंद दाराआड चर्चा ; गळती रोखण्याचा सेनेचा प्रयत्न
संगमेश्वर, ता. ३०ः भाजपचे आमदार, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांचा कोकण दौरा पार पडला. मुंबई-गोवा हायवेची पाहणी करत त्याबाबत चव्हाण सध्या आढावा घेतला आणि अधिकाऱ्यांना सूचनादेखील केल्या आहेत; पण या दौऱ्यांमध्ये राजकीय चर्चादेखील अधिक झाली. कारण, कोकण शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. सध्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन आमदार शिंदे गटामध्ये सामील झालेले आहेत; पण त्यानंतर देखील स्थानिक पातळीवरील गळती रोखण्यास शिवसेना आटोकाट प्रयत्न करीत आहेत.
रवींद्र चव्हाण यांच्या या दौऱ्यादरम्यान शिवसेनेचे उपनेते आणि लांजा-राजापूर या विधानसभा मतदार संघाचे आमदार राजन साळवी यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली. लांजातील शासकीय विश्रामगृहात २० मिनिटे ते अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली आहे. चव्हाणदेखील कोकणातील आहेत. मागील काही वर्षांपासून मुंबई-गोवा हायवेचा प्रश्न प्रलंबित आहे. शिवाय इतर विकासात्मक कामदेखील असून त्यांची मागणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व दिले जात आहे. बंद दाराआड नेमकी काय चर्चा झाली? याचा तपशील अद्याप तरी बाहेर आलेला नाही. कोकणातील शिवसेनेचा बडा नेता शिंदे गटात जाण्याच्या मार्गावर आहे, अशी देखील चर्चा मागच्या आठ ते दहा दिवसांमध्ये कोकणासह राज्यभरात झाली होती. त्यावर राजन साळवी यांनी बातम्या निराधार असल्याचं म्हटलं होते.
रवींद्र चव्हाण यांनी परशुराम घाटाची पाहणी केली होती. त्या वेळी शिवसेनेचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या गाडीतून एकत्रित प्रवासदेखील केला होता. त्या वेळी जाधव यांना या प्रवासाबाबत विचारले असता जाधव म्हणाले, आम्ही कोकणातील लोकप्रतिनिधी आहोत. कोकणातील समस्यांबाबत एकत्र येणं गरजेचं आहे. त्याकडे राजकीयदृष्टीने पाहता कामा नये. चव्हाण हे आमचे मित्र आहेत. सत्ताधाऱ्यांनी राजकीय मतभेद बाजूला ठेवण्याची तयारी दर्शवली असेल तर त्याचे आम्हीदेखील स्वागतच करणार, अशी प्रतिक्रिया त्यानी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91832 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..