वागदेतील बंद मार्गिका अखेर सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वागदेतील बंद मार्गिका अखेर सुरू
वागदेतील बंद मार्गिका अखेर सुरू

वागदेतील बंद मार्गिका अखेर सुरू

sakal_logo
By

46598
वागदे : येथील खुली करण्यात आलेली मार्गिका.


वागदेतील बंद मार्गिका अखेर सुरू

वाहन चालकांतून समाधान; एकेरी मार्गिकेमुळे झाले होते अपघात

कणकवली, ता.३० : मुंबई-गोवा महामार्गावरील गोपुरी आश्रम ते गडनदी पूल या दरम्‍यानची बंद असलेली मार्गिका आज दुपारपासून खुली करण्यात आली. यामुळे वाहन चालकांतून समाधान व्यक्‍त झाले. स्थानिक जमीन मालकांना मोबदला अदा झाला नसल्‍याने येथील मार्गिकेचे काम गेली तीन वर्षे बंद होते.
गोपुरी आश्रम ते गडनदी पूल या दरम्‍यान एकाच मार्गिकेवरून वाहने ये-जा करत असल्‍याने वारंवार अपघात होत होते. गतवर्षी याच मार्गिकेवर कंटेनर कोसळून चालकाचा मृत्‍यू झाला होता. तर शुक्रवारी झालेल्‍या कंटेनर आणि जीप अपघातात जीप चालकाचा बळी गेला होता. या अपघातानंतर नागरिकांनी तब्‍बल तीन तास महामार्ग रोखून धरला होता. यावेळी जिल्‍हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोट्या सावंत, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, वागदे सरपंच रूपेश आमडोसकर, माजी सरपंच संदीप सावंत आदींनी बंद असलेली मार्गिका सुरू करण्याबाबत चर्चा करून तोडगा काढला होता. यात येथील जमीन मालकांना वीस दिवसांत जमिनीचा मोबदला अदा करण्याची ग्‍वाही प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांनी दिली होती.
---
अपघातांचे प्रमाण घटण्याची शक्यता
गेले तीन दिवस बंद असलेल्‍या मार्गिकेचे सपाटीकरण आणि खडीकरणाचे काम सुरू होते. आज दुपारनंतर ही मार्गिका खुली करण्यात आली. यामुळे गोपुरी आश्रम ते गडनदी पूल दरम्‍यान वाहन चालकांचा होणारा संभ्रम थांबणार असून अपघातांचेही प्रमाण कमी होण्याची शक्‍यता आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91841 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..