रक्तपेढ्या अद्ययावतची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रक्तपेढ्या अद्ययावतची मागणी
रक्तपेढ्या अद्ययावतची मागणी

रक्तपेढ्या अद्ययावतची मागणी

sakal_logo
By

रक्तपेढ्या अद्ययावतची मागणी
सावंतवाडी ः जिल्ह्यातील रक्ताची गरज लक्षात घेता सर्व रुग्णालयातील रक्तपेढ्या अद्ययावत करण्यासह त्यांची साठवण क्षमता वाढविण्यात यावी, अशी मागणी सावंतवाडी युवा रक्तदाता संघटनेतर्फे केली असून बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांना तसे निवेदन दिले. यासंदर्भात पाठपुरावा करून खात्यामार्फत पुरेसा निधी द्यावा, असेही त्यांनी सांगितले. मंत्री चव्हाण हे सिंधुदुर्ग दौरा आटोपून गोवा विमानतळाकडे जात असताना पेडणे येथे युवा रक्तदाता संघटनेने त्यांची भेट घेतली. संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी चव्हाण यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या. त्यानंतर जिल्ह्यातील रक्तपेढ्यांच्या समस्यांबाबत चर्चा केली. मंत्री चव्हाण यांनी याबाबत कार्यवाही करण्याची ग्वाही दिली. युवा रक्तदाता संघटनेचे मेहर पडते, वसंत सावंत, अर्चित पोकळे, देवेश पडते, सिद्धेश मांजरेकर, सूरज मठकर, गौतम माठेकर, अनिकेत पाटणकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91861 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..