खेड ः मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर येथे शिवशाही बस आणि कारचा अपघात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खेड ः मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर येथे शिवशाही बस आणि कारचा अपघात
खेड ः मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर येथे शिवशाही बस आणि कारचा अपघात

खेड ः मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर येथे शिवशाही बस आणि कारचा अपघात

sakal_logo
By

-rat30p19.jpg ः
46539
खेड ः मुंबई-गोवा महामार्गावर पोलादपूरनजीक बस आणि कारचा अपघात झाला.

-rat30p20.jpg ः
46540
अपघातातील जखमींना बाहेर काढताना स्थानिक ग्रामस्थ. (छायाचित्र ः शैलेश पालकर, पोलादपूर)


चाकरमान्यांवर काळाचा घाला
---
शिवशाही बस-मोटारी धडक; भोवडचे दोन ठार, तीन जखमी
खेड, ता. ३० ः मुंबई-गोवा महामार्गावरील पोलादपूर येथे शिवशाही बस आणि मोटारीचा अपघात झाला. यात संगमेश्वर तालुक्यातील साखरप्यालगतच्या भोवडे गावातील दोन चाकरमानी ठार, तीन गंभीर जखमी झाले. हा अपघात महामार्गावरील पोलादपूर ग्रामीण रुग्णालयापासून काही अंतरावर आज सकाळी नऊच्या सुमारास झाला.
खेडहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या शिवशाही बसला अंबरनाथहून संगमेश्वर तालुक्यातील साखरप्यालगत असलेल्या भोवडे या गावी येणाऱ्या मोटारीची धडक झाली. ही धडक इतकी जोरात होती, की शिवशाही बसच्या चालकाच्या बाजूचा टायर फुटला. या अपघातात मोटारीतील जयवंत सावंत (वय ६०, रा. अंबरनाथ), किरण घागे (२८, रा. घाटकोपर) हे दोघे मृत झाले आहेत; तर गिरीश सावंत (३४), जयश्री सावंत (५६, दोघेही रा. अंबरनाथ), अमित भितळे (३०, रा. बदलापूर) हे तिघे गंभीर जखमी झाले. जखमींना कामोठे येथील महात्मा गांधी मेमोरियल रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
जामगे (ता. खेड) येथे गणेशोत्सवासाठीच्या जादा गाडीतील प्रवासी सोडून शिवशाही गाडीचा (एमएच ०९ इएम ३५३०) चालक प्रकाश अर्जुन तरडे हा रिकामी बस घेऊन ठाण्याच्या दिशेने जात होता. त्या वेळी साखरपानजीक हा अपघात झाला. मोटारीचे चालक किरण घागे आणि त्यांच्या शेजारच्या सीटवर बसलेले जयवंत सावंत यांना जोरदार मार बसला. सावंत यांचा जागीच मृत्यू झाला; तर चालक घागे यांना उपचारांदरम्यान कामोठे येथे रवाना केल्यावर महाडदरम्यान मृत्यू झाला. साखरप्याहून देवडेकडे जाताना भोवडे हे गाव लागते. ऐन गणेशोत्सवात हा अपघात झाल्याने भोवडे मराठवाडीवर दुःखाची छाया पसरली आहे.

-----------------------------------------
चौकट
प्रवेशद्वारावरच मृत्यूची छाया
महामार्गावर पूर्वेकडील सर्व्हिस रोडवरून पश्चिमेकडे मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर जाण्यासाठी क्रॉसिंगची सुविधा नसल्याने मुंबईकडे रिकामी चाललेली शिवशाही बस आणि कोकणकडे चाललेल्या मोटारीची समोरासमोर धडक झाली. पोलादपूर शहरात पूर्व आणि पश्चिमेकडील दोन सर्व्हिस रोड आणि मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या दोन मार्गिका यावर येण्यासाठी सर्वच वाहनचालकांचा गोंधळ अन् तारांबळ उडत असून, यामुळे शहरातील प्रवेशद्वारावरच मृत्यूचे सावट तयार झाले आहे.
--

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91866 Txt Ratnagiri1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..