पावस ः गणेशगुळे मंदिर गाभाऱ्याचे सुशोभीकरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पावस ः गणेशगुळे मंदिर गाभाऱ्याचे सुशोभीकरण
पावस ः गणेशगुळे मंदिर गाभाऱ्याचे सुशोभीकरण

पावस ः गणेशगुळे मंदिर गाभाऱ्याचे सुशोभीकरण

sakal_logo
By

rat३०p२२.jpg
46582
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे येथील स्वयंभू देवस्थानचे नूतनीकरण करण्यात आले.

गणेशगुळे मंदिर गाभाऱ्याचे सुशोभीकरण
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ३० ः दिवसेंदिवस गणेशभक्तांची संख्या वाढत असल्याने त्यांना गणेशगुळे येथील स्वयंभू गणेश मंदिराला भेट दिल्यानंतर शांती, समाधान मिळावे, याकरिता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने देणगीदारांच्या माध्यमातून मंदिर गाभाऱ्याचे सुशोभीकरण करण्यात आले. त्यामुळे भक्तांमधून समाधान व्यक्त होत आहे.
रत्नागिरी तालुक्यातील गणेशगुळे भंडारवाडी परिसराचे आराध्य दैवत असलेले श्री गणेश यांचे डोंगरावरील कातळावर असलेले स्वयंभू गणेश मंदिर प्रसिद्ध आहे. पूर्वी त्याला ‘गलबतवाल्यांचा गणपती’ असे म्हटले जायचे. भंडारवाडी परिसरात पूर्वीच्या काळी मच्छिमारी व्यवसाय करत असल्याने त्यांच्या अनेक मच्छिमारी बोटी होत्या. मच्छिमारीसाठी बोटी समुद्रात नेल्यानंतर त्यांच्या व्यवसायात भरभराट करण्याचे काम स्वयंभू गणेश करत असल्याची भावना होती. त्यामुळे अनेकांची या स्थानावर श्रद्धा होती. गेली अनेक वर्षे परिसरामध्ये गणेशोत्सव काळात प्रत्येकाच्या घरी गणपती आणला जात नव्हता. कारण सड्यावर स्वयंभू गणपती असल्यामुळे तेच आमचे श्रद्धास्थान असल्याचे सांगितले जाते; परंतु सध्या काही ठराविक लोक नवशिक गणपतीच्या माध्यमातून काही मूर्ती आणतात; अनेक भक्तांना गणेशगुळ्याचा गणपती पावत असल्यामुळे अनेकांची पावले या मंदिराकडे वळत असतात. भाविकांनी दिलेल्या देणगीच्या माध्यमातून मंदिराच्या गाभाऱ्याचे सुशोभीकरण करण्यात आले. काम पूर्णत्वाला गेल्यानंतर गाभाऱ्यामध्ये ‘श्रीं’वर पूजा, अभिषेक, होमहवन करण्यात आले. या वेळी देवस्थान समितीचे अध्यक्ष विक्रांत रांगणकर व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
-------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91875 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..