तल्लखतेसाठी कराटे प्रशिक्षण गरजेचे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तल्लखतेसाठी कराटे प्रशिक्षण गरजेचे
तल्लखतेसाठी कराटे प्रशिक्षण गरजेचे

तल्लखतेसाठी कराटे प्रशिक्षण गरजेचे

sakal_logo
By

swt3020.jpg
46618
कराटे स्पर्धेतील विजेते स्पर्धक.

तल्लखतेसाठी कराटे प्रशिक्षण गरजेचे
विजय केळुसकर ः मालवणात कराटे परीक्षेला प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. ३० : कराटे ही एक अशी कला आहे की, ज्यामुळे आपण सहनशीलता, चपळाई, तल्लखता व आत्मविश्वास हे गुण अंगात भिनवू शकतो. म्हणूनच प्रत्येक विद्यार्थी-विद्यार्थिनीने व युवक-युवतीने कराटेचे शिक्षण घेतलेचे पाहिजे, असे प्रतिपादन किंग्स स्पोर्टस शोतोकॉन कराटे असोसिएशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्हा मुख्य कराटे प्रशिक्षक विजय केळुसकर यांनी केले.
कराटे असोसिएशन ऑफ इंडिया व फिट इंडिया असोसिएशन यांची अधिकृत मान्यताप्राप्त किंग्स स्पोर्टस शोतोकॉन कराटे असोसिएशन ऑफ इंडियातर्फे घेण्यात आलेल्या कराटे बेल्ट परीक्षेत मालवणच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळविले.
मामा वरेरकर हॉल येथे ही कराटे बेल्ट परीक्षा घेण्यात आली. परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी असे : येलो बेल्ट-नावीन्य डोळस, अदिती परब, युती यमकर, ऑरेंज बेल्ट-मानस जुवाटकर, हेरंब वळंजू, अभिनंदन गरगटे, ग्रीन बेल्ट-रघुनाथ कांडरकर, महेंद्र कांडरकर. स्वयंम मुणगेकर, अस्मी चव्हाण. ज्युनिअर ब्लू-कार्तिक सरमळकर, लौकिक मालवणकर. सिनिअर ब्लू बेल्ट- जुई गरगटे. ज्युनिअर ब्राऊन बेल्ट-साई निकम. सिनिअर ब्राऊन बेल्ट-अद्वैत नाईक यांनी यश मिळवले. ही बेल्ट परीक्षा किंग्स स्पोर्टस शोतोकॉन कराटे असोसिएशन ऑफ इंडियाचे परिक्षक व नॅशनल रेफ्री विजय केळुसकर (फिक्स डॅन ब्लॅक बेल्ट) यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली. या सर्व विद्यार्थ्यांना मुख्य प्रशिक्षक केळुसकर, श्रावणी केळुसकर व सहप्रशिक्षक सानिका गावकर यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91883 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..