चिपळूण ः गणेश आगमनासाठी भक्त आतूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण ः गणेश आगमनासाठी भक्त आतूर
चिपळूण ः गणेश आगमनासाठी भक्त आतूर

चिपळूण ः गणेश आगमनासाठी भक्त आतूर

sakal_logo
By

rat३०p१७.jpg
46623
ः चिपळूण शहरातील चिंचनाक्यात पुन्हा वाहतूककोंडी झाली.
....
खरेदीला उधाण; वाहतूककोंडीचा ताण!

गणेश आगमनाच्या पूर्वसंध्येला चिपळुणातील चित्र; भक्त आतूर, व्यापारी खुशीत
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. ३० ः आपल्या आगमनाने भक्तांच्या जीवनात आनंद, सुख, हास्य आणि समृद्धीची बरसात करणारा घरगुती गणेशोत्सव अवघ्या काही तासावर येऊन ठेपला आहे. अवघे चिपळूण बाप्पाच्या आगमनासाठी आतूर झाले आहे. बाजारपेठेत गणेश आगमनाच्या पूर्वसंध्येलाही शहरात खरेदीचा जोर कायम होता. आरासाच्या साहित्य खरेदीसाठी गर्दीला उधाण आले आहे. त्यामुळे आज दिवसभर वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले.
यावर्षी गणेशोत्सवनिमित्त घराघरात श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यासाठी प्राथमिक तयारी, देखावा आरासाची लगबग सुरू झाली आहे. मंडळांची मांडव उभारणी पूर्ण झाली असून, बाजारपेठेत आहाराच्या साहित्य खरेदीसाठी गर्दीला उधाण आले आहे. गेली तीन वर्षे एकामागून एक आलेल्या संकटाचे मळभ दूर करत यावर्षीचा गणेशोत्सव निर्बंधमुक्त आणि मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे. घरगुती गणेशोत्सव यावर्षी सहा दिवसांचा असणार आहे.
सोमवारी सकाळपासून शहरातील प्रमुख बाजारपेठा नागरिकांच्या गर्दीने फुलून वाहत आहेत. साहित्य खरेदीची लगबग, घरातील मंडळीची उडालेली धांदळ आणि ग्राहकांना सेवा देताना व्यावसायिकांची होणारी धावपळ तरीही सर्वांमध्ये उत्साहाचे मंगलमय वातावरण होते. शनिवारपासून खरेदी सुरू असली तरी उत्सवाला फक्त काही तास शिल्लक असतानाही बाजारपेठेत खरेदीसाठी जणू पूर्ण शहर रस्त्यावर आले होते.
..
चौकट
नागरिकांची एकच झुंबड
शहरातील पानगल्ली, गांधीचौक, गुहागरनाका, मार्कंडी, चिंचनाका, नगरपालिका परिसर, भाजीमंडई परिसर आदी ठिकाणी आरासाच्या साहित्य खरेदीसाठी नागरिकांची एकच झुंबड झाली होती. पाने, फळे, फुलांच्या माळा, तोरण, विद्युत रोषणाई, मखर, फुलदाणी असे अनेक साहित्य होते. त्यामुळे ठिकठिकाणी वाहतूककोंडी होताना दिसून आली. गल्ल्यांमध्ये घरादाराची साफसफाई सुरू आहे. घर सजवणे, विद्युत रोषणाईसाठीच्या माळांची जोडी सुरू आहे.
------------------------------
चौकट
रस्ते मंडपाने व्यापले
तीन वर्षांच्या निर्बंधानंतर मुख्य गणेशोत्सव साजरा होत असल्याने यावर्षी गणेश मंडळांची संख्या वाढली आहे. त्यामुळे एका गल्लीत किमान दोन-तीन मंडळांचे मांडव उभारले आहेत. अनेक रस्ते मांडवाने व्यापले आहेत. नागरिकांना पर्यायी रस्ते शोधत जावे लागत आहेत. त्यामुळे मोठी वाहतूककोंडी होत आहे. खाटीक आळी, पानगल्ली परिसरात हा त्रास नागरिकांना होत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91885 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..