संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

मुसळा देवी मंदिर फोडून चोरी
रत्नागिरी ः तालुक्यातील मालगुंड येथील श्री मुसळा देवी मंदिर फोडून चोरट्याने ६ हजार रुपये लांबवल्याचा प्रकार २८ ते २९ ऑगस्ट या कालावधीत घडला. या प्रकरणी अमित प्रभाकर मेहंदळे (४५, रा. रहाटाघर मालगुंड, रत्नागिरी) यांनी जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. संशयातून तुषार सुभाष पाटील (३६, रा. मालगुंड भाटलेवाडी, रत्नागिरी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयिताने श्री मुसळा देवी मंदिराच्या पुढील दरवाजची कडी-कोयंडी उचकटून मंदिरात प्रवेश केला. त्यानंतर दानपेटीचे कुलूप तोडून त्यातील नाणी आणि नोटा असा एकूण ६ हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक कळेकर करत आहेत.
............
तरुणाची ४१ हजार रुपयांची फसवणूक
रत्नागिरी ः क्रेडिट कार्डचा फाईन रिफंड होणार असल्याची बतावणी करत तरुणाची सुमारे ४१ हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याप्रकरणी महिलेविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून, ही घटना १७ ऑगस्टला सायंकाळी ५ वा. कारवांचीवाडी येथे घडली. प्रियांका शर्मा असे गुन्हा दाखल केलेल्या संशयित महिलेचे नाव आहे. तिच्या विरोधात राजू सुभाष पवार (४२, रा. आदर्श वसाहत कारवांचीवाडी, रत्नागिरी) यांनी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. १७ ऑगस्टला सायंकाळी राजू पवार यांच्या मोबाईलवर फोन करणाऱ्‍या महिलेने मी पुणे येथील अ‍ॅक्सिस बँकेतून बोलत असल्याचे सांगितले. त्यानंतर तुमचे क्रेडिट कार्ड उशिराने अ‍ॅक्टिव्ह केल्याने ५९० रुपयांचा लागलेला फाईन तुम्हाला रिफंड होणार असल्याचे सांगून मोबाईलवर आलेल्या मेसेजमधील कोड विचारून घेतला. तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवत पवार यांनी तो कोड सांगितल्यावर त्यांच्या बँक खात्यातून ४० हजार ९४० रुपये काढण्यात आल्याचा मेसेज आला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर राज पवार यांनी सोमवार २९ ऑगस्टला ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सूर्य करत आहेत.
........
ठार मारण्याची धमकी, तिघांवर गुन्हा
रत्नागिरी ः शहरातील राजीवडा येथे अज्ञात कारणातून पती-पत्नीला शिवीगाळ करत हातांनी तसेच चाकूने मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी चौघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २७ ऑगस्टला सकाळी ९.३० वा. घडली. इरसाल भाटकर, वसीक भाटकर, जुबेदा भाटकर, रोजीना भाटकर (सर्व रा. राजीवडा, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात गफार अबीब पकाली (५५, रा. राजीवडा, रत्नागिरी) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार २७ ऑगस्टला सकाळी ते राजीवडा येथील मिनाज किराणा शॉपमध्ये जात असताना संशयितांनी त्या ठिकाणी येऊन त्यांना तसेच त्यांची पत्नी रियाना पकाली या दोघांनाही मारहाण करत ठार माण्याची धमकी दिली. या प्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलिस फौजदार राठोड करत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91902 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..