सजली बाजारपेठ, खरेदीची लगबग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सजली बाजारपेठ, खरेदीची लगबग
सजली बाजारपेठ, खरेदीची लगबग

सजली बाजारपेठ, खरेदीची लगबग

sakal_logo
By

46633
वेंगुर्ले : येथील पवनपुत्र भाजी मार्केटमध्ये खरेदीसाठी ग्राहकांनी केलेली गर्दी.


सजली बाजारपेठ, खरेदीची लगबग

वेंगुर्लेतील गणेशोत्सव; प्रशासनाकडून चोख नियोजन

सकाळ वृत्तसेवा
वेंगुर्ले, ता. ३० ः गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येथील बाजारपेठेत आज सकाळपासून विशेषतः माटवीचे साहित्य खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. चाकरमानीही मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने शहरात वर्दळ पाहायला मिळाली.
वेंगुर्ले शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बाजारपेठेत गणेशोत्सवाच्या अनुषंगाने पालिकेमार्फत वाहतूक व बाजारपेठ व्यवस्थेबाबत योग्य नियोजन केल्याचे दिसून आले. मुख्य बाजारपेठेतून एसटीसह अवजड वाहतूक बंद करून ती पर्यायी मार्गाने वळविली आहे. मुख्य रस्त्यावर माटवी साहित्य विक्रेत्यांना बसण्यासाठी पालिकेमार्फत मुभा दिली होती. त्यामुळे दोन दिवसांपासून माटवीचे साहित्य खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. गाडीअड्डा परिसर, मुख्य बाजारपेठ तसेच दाभोली नाकापर्यंत माटवीचे साहित्य विक्रेते बसले होते.
मुख्य बाजारपेठेत ग्रामीण तसेच शहरी भागातील नागरिकांनी विविध प्रकारच्या साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती. चाकरमानीही मोठ्या प्रमाणात दाखल झाल्याने वर्दळ वाढली आहे. शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी पोलिस निरीक्षक अतुल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य बाजारपेठ, हॉस्पिटल नाका, रामेश्वर मंदिर स्टॉप, मारुती मंदिर स्टॉप, दाभोली नाका येथे पोलिस, होमगार्डचा बंदोबस्त होता. याबाबत पोलिसांकडून योग्य नियोजन केले होते. सोमवारी व मंगळवारी चित्रशाळेतून गणेशमूर्ती घरी नेण्यासाठी भक्तगणांची लगबग दिसून येत होती. मागील काही दिवसांत खरेदीसाठी बाजारात मंदी असली तरी सोमवार, मंगळवारी मात्र बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91904 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..