तळेरे बाजारपेठेत नानातऱ्हेच्या वस्तू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तळेरे बाजारपेठेत नानातऱ्हेच्या वस्तू
तळेरे बाजारपेठेत नानातऱ्हेच्या वस्तू

तळेरे बाजारपेठेत नानातऱ्हेच्या वस्तू

sakal_logo
By

तळेरे बाजारपेठेत नानातऱ्हेच्या वस्तू

उत्सव बाप्पाचा; श्रींच्या आगमनासाठी भक्त सज्ज

तळेरे, ता. ३० ः येथील बाजारपेठेत आज सकाळपासून ग्राहकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. दुपारी पावसाच्या आगमनाने मात्र नंतर ग्राहकांनी बाजारात पाठ फिरवली; परंतु, सायंकाळी उशिरापर्यंत बाजारात ग्राहक खरेदीसाठी येत होते.
कोकणातील गणेशोत्सव हा सर्वात मोठा सण. गणेशभक्त अक्षरश: बाप्पाच्या आगमनासाठी आतुरलेला असतो. अनेकविध वस्तूंनी आज बाजारपेठही फुलली होती. बाप्पाचे आगमन आणि सजावटीसाठी लागणाऱ्या विविध वस्तू, फळे, कपड्यांची बाजारात मोठी आवक दिसून आली. भाजी, फळे, सजावटीसाठी लागणाऱ्या शोभिवंत वस्तू, रंग, नैवेद्यासाठी लागणारे विविध प्रकार बाजारात विक्रीसाठी उपलब्ध झाले आहेत. भजनासाठी लागणारी विविध प्रकारची वाद्येही बाजारात उपलब्ध झालेली असून त्यालाही मोठी मागणी आहे.
गणपतीसाठी लागणारे हरणे, कवडाळे, पोफळी, शहाळी, विविध फळे, कपडे, विविध शोभेच्या वस्तू, भाजी, भजनासाठी लागणारे खाऊ, अनेक प्रकारचे नैवेद्य, मोदक अशा हरतर्हेच्या वस्तू पहायला मिळतात. यंदा महागाईची झळ असली तरीही तेवढाच उत्साह आणि आनंद भक्तांमध्ये दिसून येतो. बाजारात ४० ते ६० रुपयांपर्यंत शहाळी विक्री होत होती. तर मोदक विविध उत्पादकांनुसार किंमती ठरलेल्या होत्या. मोदकांमध्ये काजू, आंबा, फणस अशा विविध प्रकारचे मोदक बाजारात उपलब्ध आहेत. तर त्यांच्या किंमती साधारणपणे ११ मोदक ४० रुपये तर २१ मोदक ६० रुपये अशी विक्री केली जात आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91933 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..