महिलेवर हल्लाप्रकरणी संशयितास पोलिस कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलेवर हल्लाप्रकरणी
संशयितास पोलिस कोठडी
महिलेवर हल्लाप्रकरणी संशयितास पोलिस कोठडी

महिलेवर हल्लाप्रकरणी संशयितास पोलिस कोठडी

sakal_logo
By

महिलेवर हल्लाप्रकरणी
संशयितास पोलिस कोठडी
सावंतवाडी, ता. ३० ः सातार्डा साटेली येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादात महिलेला गंभीर जखमी केल्याप्रकरणी संशयिताला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. ज्ञानेश्वर गंगाराम सावंत (वय ४८, रा. देवळासवाडी), असे त्याचे नाव आहे. हा प्रकार सोमवारी घडला होता.
सातार्डा साटेली येथील फिर्यादी तसेच संशयिताची घरे लागूनच आहेत. दोघे एकमेकांचे शेजारी असून सोमवारी सायंकाळी त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. यावेळी ज्ञानेश्वर सावंत याने चिरे तासणीचा मोद घेऊन ललिता नाईक यांच्या डोक्यावर मारला. पती लवू नाईक हे सोडवायला गेले असता त्यांच्या पायावर दांडा मारून त्यांनाही दुखापत केली. यात महिला गंभीर जखमी झाली होती. याप्रकरणी लवू नाईक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार येथील पोलिस ठाण्यात संशयितावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज त्याला ताब्यात घेऊन येथील न्यायालयात करण्यात आले असता पोलिस कोठडी देण्यात आली. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक सय्यद करीत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91940 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..