सव्वा दोन लाखाची दारु जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सव्वा दोन लाखाची दारु जप्त
सव्वा दोन लाखाची दारु जप्त

सव्वा दोन लाखाची दारु जप्त

sakal_logo
By

46693
बांदा ः दारु वाहतूक प्रकरणातील संशयित व मुद्देमालासह अधिकारी.

सव्वा दोन लाखाची दारू जप्त

शेर्लेत कारवाई; कुडाळमधील एक ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ३० ः शेर्ले (ता. सावंतवाडी) येथे गोव्यातून कुडाळच्या दिशेने होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीविरोधात अबकारी खात्याच्या कोल्हापूर भरारी पथकाने कारवाई केली. २ लाख २६ हजाराची दारू, तीन लाखाची मोटार, असा पाच लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. श्रीकृष्ण सुभाष कदम (वय ३२, रा. हुमरमळा अणाव, ता. कुडाळ), असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
अधिक माहिती अशी, शेर्लेत ही कारवाई झाली असून विदेशी मद्याच्या ४२० बाटल्या व बिअरचे १२० टीन, अशी एकूण २ लाख २६ हजार २०० रुपयांची दारु जप्त करण्यात आली. दारू वाहतुकीसाठी वापरलेली ३ लाखाची मोटार (एमएच ०४ जीई ९०९८), असा एकूण ५ लाख २६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. बेकायदा दारु वाहतूक प्रकरणी श्रीकृष्ण सुभाष कदम याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. कोल्हापूर विभागीय आयुक्त बी. एच. तडवी यांच्या आदेशान्वये निरीक्षक एस. जे. डेरे, दुय्यम निरीक्षक आर. जी. येवलुजे, एस. एस. गोंदकर, काँस्टेबल सुशांत बनसोडे, विलास पवार, अमोल यादव, दीपक कापसे यांच्या पथकाने ही कारवाई केली. दुय्यम निरीक्षक एस. एस. गोंदकर अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91946 Txt Sindhudurg

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..