५ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

५

sakal_logo
By

राजापूरातील मोकाट जनावरांचा
लिलाव करून दंडवसुली करू
राजापूर, ता. ३० ः शहरातील वाहतुकीला अडथळा ठरत असलेल्या मोकाट गुरांच्या समस्येने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. ही समस्या सोडवण्यासाठी नगर पालिका प्रशासनाने मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यामध्ये मोकाट जनावरांना पकडून त्यांच्या मालकांवर पालिकेने दंडात्मक कारवाई केली. काहींचा लिलाव करून दंडाची रक्कम वसूल केली आहे. शहरामध्ये फिरत असलेल्या मोकाट गुरांचा त्यांच्या मालकांनी स्वतःहून बंदोबस्त करावा, अन्यथा दंडात्मक कारवाई करू, असा इशारा मुख्याधिकारी प्रशांत भोसले यांनी दिला आहे. प्रशासनाने मुख्याधिकारी भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली मोकाट जनावरांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेत अशी मोकाट फिरणारे जनावरे पकडण्याचीही मोहीम राबवली. त्यामध्ये पकडलेल्या गुरांपैकी काही गुरे संबंधित गुरांच्या मालकांनी दंडात्मक रक्कम भरून पालिकेकडून सोडवून घरी नेली. उर्वरित गुरांचा प्रशासनाने लिलाव करून दंडात्मक रक्कमेची वसुली केली. त्यानंतर, पुन्हा एकदा पालिकेने मोकाट गुरांच्या विरोधातील धडक कारवाई हाती घेतली आहे.
------------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y91962 Txt Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..