मडुरा-सातार्डा रस्त्याची स्वच्छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मडुरा-सातार्डा रस्त्याची स्वच्छता
मडुरा-सातार्डा रस्त्याची स्वच्छता

मडुरा-सातार्डा रस्त्याची स्वच्छता

sakal_logo
By

46714
मडुरा ः सातार्डा मार्गावरील रस्त्याच्या दुतर्फा सफाईचे सुरू असलेले काम.


मडुरा-सातार्डा रस्त्याची स्वच्छता
बांदा ः मडुरा-सातार्डा मार्गावरील दुतर्फा झाडींची साफसफाई करण्याचे काम अखेर सोमवारपासून सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेतले. त्यामुळे नागरिक व वाहनचालकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. भाजपचे मडुरा शक्तीकेंद्र प्रमुख यशवंत माधव यांनी प्रशासनाचे लेखी निवेदनाद्वारे याबाबत लक्ष वेधले होते.
मडुरा-सातार्डा मार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झुडपे वाढली होती. त्यामुळे विरुद्ध दिशेने दोन वाहने आल्यास बाजू देताना वाहन चालकांना कसरत करावी लागत होती. वळणांवर वाहने निदर्शनास पडत नसल्याने अपघातही झाले होते. याबाबत यशवंत माधव यांनी आठ दिवसांपूर्वी बांधकाम विभागाला निवेदन दिले होते. झुडपे सफाईचे काम हाती न घेतल्यास सावंतवाडी कार्यालयात घेराव घालण्याचा इशारा दिला होता. तत्पूर्वी सोमवार सकाळपासूनच प्रशासनाने झुडपे सफाईचे काम हाती घेतले आहे. नागरिक व वाहनचालकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
-------------
वेंगुर्लेत सर्वाधिक पाऊस
सिंधुदुर्गनगरी ः २४ तासांत वेंगुर्ले तालुक्यात सर्वाधिक ३.० मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी १.० मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर एकूण सरासरी २६२५.३ मिलीमीटर पाऊस झाला आहे. तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. देवगड- १.१ (२२०२.१), मालवण-०.४ (२४१५.६), सावंतवाडी- ०.६ (२८७१.८), वेंगुर्ले- ३.० (२४५८.१), कणकवली- ०.९ (२७९१.६), कुडाळ- १.२ (२७३४.४), वैभववाडी- १.३ (३०८०.४), दोडामार्ग- ०.२ (२८५७.४) असा पाऊस झाला आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kop22y92029 Txt Sindhudurg Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..